हार्दिक पंड्या इतका माज बरा नाही; मुंबई इंडियन्स आणि गुजरातचे फॅन्स भडकले

Hardik Pandya Rude With Rohit Sharma

Hardik Pandya Rude With Rohit Sharma :  मुंबई इंडियन्सचा पहिला सामना आज गुजरात टायटन्सविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळला गेला.

IPL 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्या करताना दिसत आहे. त्यामुळे Rohit Sharma यावेळी फलंदाज म्हणून IPL 2024 खेळतोय आहे.

पंड्या रोहित शर्माला लाँग-ऑनला जाण्यास सांगताना दिसला आणि मुंबई इंडियन्सच्या माजी कर्णधाराचा रोहित शर्मा (Rohit Sharma) यावर विश्वास बसला नाही कारण त्याने सीमेजवळ फारच क्वचितच फील्ड करतो. रोहितने पुन्हा-पुन्हा हार्दिकला विचारले मीच का? हार्दिकने हा तूच म्हणत मागे जाण्यास सांगितले. हार्दिक पंड्या याने रोहित शर्माला सामन्यात एक दोन नाहीतर चार वेळा जागाब दलायला सांगितली.

असे झाल्याने रोहित शर्माचा चेहरा पडला होता. रोहितची नाराजी चाहत्यांच्या नजरेतून सुटली नाही. रोहितला हार्दिक पांड्या अपमानजनक वागणूक देत असल्याची चर्चा फॅन्स मध्ये सुरु झाली आहे. मुंबई  इंडियन्सच्या फॅन्सने हार्दिक (Hardik Pandya) वर टीका करण्यास सुरवात केली आहे.

हार्दिक पंड्या इतका माज बरा नाही नाही म्हणत मुंबई इंडियन्स फॅन्स सोबत गुजरातचे फॅन्सही हार्दिक पांड्यावर भडकले आहेत. सोशल मीडियावर रोहितच्या बाजुने चाहते बोलत असून पंड्या घमंडी, स्वार्थी असल्याचं म्हणत नेटकरी त्याला धारेवर पकडत आहेत.

हार्दिक पांड्या नाणेफेकीसाठी मैदानात आला. त्यावेळीही उपस्थित असणाऱ्या चाहत्यांकडून हार्दिक पांड्याला ट्रोल करण्यात आले. चाहत्यांनी हार्दिक पांड्यासमोरच रोहित रोहित रोहित असा जयघोष सुरु केला होता.

केविन पीटरसन याने हि यावर प्रतिक्रिया देत म्हणाला,” आयपीएलमध्ये याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूला चाहत्यांनी ट्रोल केल्याचे पहिले नाही. हार्दिक पांड्यामुळे गुजरात आणि मुंबईचे चाहते नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर पीटरसनच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

आजची मॅच अहमदाबादला होती तरी हार्दिकला एवढे ट्रोल केले, एक एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा सामना होणार आहे. त्या सामन्यात काय होईल? हार्दिक पांड्याची अवस्था ना घर का ना घाट का अशीच झाली आहे. When Was The Last Time An Indian Cricketer Was Booed In India?

Mumbai Indians Playing 11

हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक), टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद नबी, आकाश मधवाल, पियुष चावला, जेराल्ड कोएतझी, नेहल वढेरा

Gujarat Titans Playing 11

शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, केन विल्यमसन, डेव्हिड मिलर,शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, उमेश यादव आणि स्पेन्सर जॉन्सन.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.