Share

NEET Paper Leak: मनीषा वाघमारे ब्यूटी पार्लर चालवते की पेपर फोडते? सीबीआयचा कोर्टात मोठा गौप्यस्फोट

नीट पेपरफुटीतील आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज राऊज एव्हेन्यू कोर्टाने राखून ठेवला आहे. सीबीआयने तिच्याविरुद्ध विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याचे भक्कम पुरावे सादर केले आहेत.

Published On: 

Manisha Waghmare in NEET paper leak case court hearing CBI argument

🕒 1 min read

दिल्ली – देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणात आता रोज नवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. जे पेपर लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवतात, ते चक्क एका ब्यूटी पार्लरमधून फुटत होते का?

सीबीआयने दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टात हाच अत्यंत गंभीर दावा केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनीषा वाघमारे हिच्या जामीन अर्जावर शुक्रवारी महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. यावेळी तपास यंत्रणांनी जामिनाला कडाडून विरोध केला असून, कोर्टाने आपला अंतिम निर्णय ९ जूनपर्यंत राखून ठेवला आहे. घाईघाईत जामीन अर्ज का दाखल केला, असा थेट सवाल न्यायाधीश अजय गुप्ता यांनी बचाव पक्षाला विचारला.

NEET Paper Leak Manisha Waghmare

आपल्या अशिलाविरोधात कोणताही ठोस पुरावा नाही आणि सीबीआयला दोनदा झडती घेऊनही घरात कोणतीही रोख रक्कम सापडली नाही, असा दावा वाघमारे यांच्या वकिलांनी केला. सोबतच आपण ४७ वर्षांचे असून ‘व्हर्टिगो’ (चक्कर येणे) या गंभीर आजाराने ग्रस्त आहोत, असा वैद्यकीय युक्तिवादही करण्यात आला. मात्र, कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळून लावला आणि तुरुंगात सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याचे सुनावले.

मनीषा स्वतःला सर्टिफाइड शिक्षण समुपदेशक म्हणवून घेत असली तरी ती प्रत्यक्षात ब्यूटी पार्लर चालवते. तिनेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचे प्रश्न लोखंडे नावाच्या व्यक्तीला दिले, जे पुढे शुभमपर्यंत पोहोचले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम घेऊन पेपर लीक केल्याचे अधिकृत जबाब सीबीआयकडे आहेत. वाघमारे यांच्या खात्यात साडेतीन लाख रुपयांची संशयास्पद एन्ट्री आढळली असून, बचाव पक्षाने मात्र ही रक्कम ‘गिफ्ट डीड’मधून आल्याचा दावा केला आहे.

याच पेपरफुटीच्या तणावातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना नागपुरातून समोर आली आहे. २० मे रोजी आत्महत्या केलेल्या १९ वर्षीय आकांक्षा चतुर्वेदी या विद्यार्थिनीची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. “माझ्यात नीटची फेरपरीक्षा देण्याची अजिबात हिंमत नाही,” असे तिने यात लिहून ठेवले आहे. त्यामुळे या घोटाळ्याची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत आणि विद्यार्थ्यांवर किती ताण आहे, हेच पुन्हा एकदा उघड झाले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही