प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: रविवारी, ११ ऑक्टोबर २०२६ पासून शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri 2026) सुरुवात होत आहे. नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणाऱ्यांसाठी आता रोज काय बनवायचे, हा प्रश्न उरणार नाही. कारण, नऊ दिवसांच्या उपवासासाठी नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाचा परिपूर्ण सात्त्विक आहार प्लॅन समोर आला आहे.
उपवासाला केवळ साबुदाणा आणि बटाट्यावर अवलंबून राहण्याऐवजी आता आहारात वैविध्य आणता येईल. यामध्ये राजगिरा, भगर, रताळे, मखाणे, पनीर, दूध-दही आणि फळांचा समतोल समावेश करून आरोग्यादायी मेन्यू तयार करण्यात आला आहे.
पहिल्या दिवशी फळे, दूध, साबुदाणा खिचडी, भाजलेले मखाने आणि राजगिरा भाकरी-बटाटा भाजीचा आस्वाद घेता येईल. दुसऱ्या दिवशी रताळ्याचे थालीपीठ, भगर-दाण्याची आमटी, नारळ पाणी आणि दुधी भोपळ्याचे सूप घेऊ शकता. तर, तिसऱ्या दिवशी राजगिरा लाडू, दही-साबुदाणा वडे, शेंगदाणा-खजूर लाडू आणि वरईची खिचडी असा मेन्यू असेल.
चौथ्या दिवशी मखाणा खीर, राजगिरा पुरी-बटाटा भाजी, फळांचा चाट आणि पनीर मखाणा भाजी बनवता येईल. पाचव्या दिवसासाठी साबुदाणा थालीपीठ, रताळ्याची भाजी, ताक-मखाणे आणि साम्याचा पुलाव उत्तम पर्याय आहे. सहाव्या दिवशी फळे-दूध-सुकामेवा, भगर डोसा, उकडलेले रताळे आणि दुधी भोपळ्याची भाजी असा आहार घेता येईल.
सातव्या दिवशी केळी-मखाणा शेक, साबुदाणा खिचडी, नारळपाणी-सुकामेवा आणि वरईची खीर असा बेत असेल. आठव्या दिवशी राजगिरा थालीपीठ, भगर-बटाटा रस्सा, फळे-मखाणे आणि शिंगाडा पुरी-पनीर भाजी खावी. नवव्या आणि शेवटच्या दिवशी फळे-दूध, सात्त्विक उपवास थाळी, लिंबूपाणी आणि हलकी वरई खिचडीने सांगता करता येईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याला लग्नाची इच्छा भोवली; परदेशी नवरदेवाच्या आमिषाने गमावले १७ लाख रुपये
- ऑफिसमध्ये काम करताना भूक लागते? ड्रॉवरमध्ये ठेवा ‘हे’ ७ पौष्टिक स्नॅक्स
- पुढच्या निवडणुकीत कसा निवडून येतो बघतोच! रोहित पवारांचा विक्रम पाचपुतेंना अजितदादा स्टाईल इशारा
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








