Share

“आम्ही फक्त सतरंज्याच उचलायच्या का?” नाशिकमध्ये भाजप कार्यकर्ते भडकले, सुनील केदारांनी काढला पळ!

Big drama in Nashik BJP! Angry workers gherao City President Sunil Kedar over ticket distribution issues.

Published On: 

Big drama in Nashik BJP! Angry workers gherao City President Sunil Kedar over ticket distribution issues.

🕒 1 min read

नाशिक : तिकिटं वाटप आणि एबी फॉर्मवरून नाशिक भाजपामध्ये सुरू झालेली धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. मंगळवारी एबी फॉर्म वाटपावरून झालेला राडा ताजा असतानाच, आज पुन्हा एकदा पक्षांतर्गत वादाचा भडका उडाला. नाशिक रोड परिसरात एका कार्यक्रमासाठी गेलेले शहराध्यक्ष सुनील केदार ( Sunil Kedar ) यांना चक्क स्वपक्षाच्याच कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. परिस्थिती इतकी चिघळली की, केदार यांना कार्यक्रमातून काढता पाय घ्यावा लागला.

नाशिक रोड भागात आज एका सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष सुनील केदार उपस्थित होते. मात्र, तिकिटं न मिळाल्याने नाराज असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केदार यांना पाहताच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. “पक्षात वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांना डावललं जात आहे,” असा आरोप करत कार्यकर्त्यांनी केदार यांना घेराव घातला. वाढता तणाव आणि कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून सुनील केदार ( Sunil Kedar ) यांनी वाद वाढू नये म्हणून तात्काळ कार्यक्रमस्थळावरून निघून जाणं पसंत केलं.

मंगळवारचा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरताना मोठा गोंधळ पाहायला मिळाला. आमदार सीमा हिरे आणि राहुल ढिकले हे आपल्या समर्थकांचे एबी फॉर्म घेऊन जात असताना, नाराज पदाधिकाऱ्यांनी त्यांचा चक्क सिनेस्टाईल पाठलाग केला. इतकंच नाही, तर नेत्यांना गाठण्यासाठी कार्यकर्ते एका फार्महाऊसवरही धडकले. “पक्षासाठी आम्ही फक्त सतरंज्याच उचलायच्या का?” असा संतप्त सवाल जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आठवड्याभरापूर्वीच भाजप आमदार देवयानी फरांदे आणि स्थानिक नेत्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस आणि ठाकरे गटातून आलेल्या आयारामाना पायघड्या आणि निष्ठावंतांना मात्र वेटिंगवर, या धोरणामुळे स्थानिक पदाधिकारी अस्वस्थ आहेत. गिरीश महाजन यांनी केलेल्या इनकमिंगला फरांदेंनी विरोध दर्शवला होता. एकंदरीत, निवडणुकीच्या तोंडावर नाशिक भाजपामधील ही दुफळी पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नेतृत्व यावर काय तोडगा काढतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!