Share

“वाघीण जखमी झाली की अधिक लढाऊ होते”; उमेदवारी मागे घेताच भाजपच्या पूजा मोरे-जाधवांचा अश्रूंचा बांध फुटला!

BJP candidate Pooja Jadhav withdraws nomination in Pune

Published On: 

Pune BJP Candidate Pooja Jadhav Withdraws Nomination: Cries in Press Meet poja more

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत वॉर्ड क्रमांक २ मध्ये मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. भाजपच्या अधिकृत उमेदवार पूजा मोरे-जाधव ( Pooja Jadhav ) यांनी सोशल मीडियावरील जोरदार ट्रोलिंग आणि विरोधाला कंटाळून अखेर आपली उमेदवारी मागे घेतली आहे. मात्र, ही घोषणा करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पूजा जाधव यांना रडू कोसळलं. “विरोधकांनी षडयंत्र रचून माझ्यासारख्या सामान्य घरातील मुलीचा बळी घेतला, पण लक्षात ठेवा, वाघीण जखमी झाल्यावर ती अधिक जोमाने काम करते,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना फटकारले आहे.

भाजपची उमेदवारी जाहीर होताच पूजा मोरे-जाधव यांच्या एका जुन्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर त्यांना लक्ष्य करण्यात आले. हा विरोध इतका तीव्र झाला की, पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून पूजा यांनी स्वतःहून माघार घेण्याचा निर्णय घेतला. “मी स्वतः हिंदू आहे आणि हिंदुत्वासाठीच काम करत राहणार. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मी मनापासून माफी मागते,” अशी कबुली त्यांनी ( Pooja Jadhav ) यावेळी दिली.

Pooja Jadhav Withdraws Nomination

आपल्या संघर्षाचा पाढा वाचताना त्या ( Pooja More ) म्हणाल्या, “आजचा दिवस माझ्यासाठी खूप कठीण आहे. बीडच्या गेवराईसारख्या दुष्काळी भागात एका सामान्य शेतकऱ्याच्या घरात माझा जन्म झाला. वयाच्या २१ व्या वर्षी मी पंचायत समितीमध्ये काम केलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, अंगावर पाच-पाच गुन्हे घेतले. पोलीस स्टेशनमध्ये दोन-दोन दिवस कोठडीत काढले, तेव्हा वकिलाची फी भरण्यासाठीही पैसे नसायचे. सामान्य घरातील मुलं पुढे येतात, हेच प्रस्थापित विरोधकांना सहन होत नाही.”

काश्मीर व्हिडीओ प्रकरणावर स्पष्टीकरण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘त्या’ व्हिडीओबद्दल बोलताना त्यांनी सविस्तर बाजू मांडली. “लग्नानंतर आम्ही काश्मीरला गेलो होतो, तेव्हा तिथे दहशतवादी हल्ला झाला होता. आम्ही तिथून लोकांना बाहेर काढलं, देवेंद्र फडणवीसांशी संपर्क साधला. व्हायरल झालेला व्हिडीओ हा त्या घटनेनंतर लगेच एका तासात दिलेली प्रतिक्रिया होती. पण तीन तासांनंतर जेव्हा सत्य समजलं की दहशतवाद्यांनी धर्म विचारून हत्या केली आहे, तेव्हा मी दुसरी प्रतिक्रियाही दिली होती. मात्र, विरोधकांनी सोयीस्करपणे अर्धाच व्हिडीओ व्हायरल करून समाजात गैरसमज पसरवला,” असा आरोप त्यांनी केला.

“मी थांबणार नाही…” एका पोस्टमुळे एखाद्या मुलीचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलं जातं, हे मी अनुभवलंय. पण मी खचणार नाही. मी सर्व अर्ज मागे घेतले आहेत, पण जिथे भाजपला गरज असेल तिथे मी काम करेन. ही माघार नाही, तर नवीन संघर्षाची सुरुवात आहे,” असं सांगत त्यांनी ( Pooja Jadhav ) अश्रू पुसत पुन्हा कामाला लागण्याचा निर्धार व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही