प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताने त्यांच्यावर आरोप करणारे व्हिडिओ शेअर करण्याचा धडाका लावला आहे. यावरून आता कॉमेडियन सुनील पाल यांनी संताप व्यक्त केला असून, केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी तनुश्री हे घाणेरडे कृत्य करत असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
नाना पाटेकर या जगात नसल्याने ते स्वतः उत्तर देऊ शकत नसले तरी, त्यांचे चाहते मात्र तनुश्रीला खडे बोल सुनावत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुनील पाल यांनी एक व्हिडिओ शेअर करत तनुश्रीला धारेवर धरले. नाना पाटेकर हे साधेपणाने राहणारे आणि शेतकरी, कला अन् जवानांची सेवा करणारे भूमिपुत्र होते, असा पाल यांनी या व्हिडिओत केला आहे.
सुनील पाल यांनी तनुश्रीला उद्देशून म्हटले आहे की, “जर तुझे डोके काम करत नसेल तर तू विश्रांती घे. जशी दहा वर्षे गायब होतीस, तशीच पुन्हा विश्रांती घे.” तसेच, नानांसारख्या महान व्यक्तीला ‘डेव्हिल’ ठरवून तुला काय साध्य करायचे आहे? प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशी खालच्या पातळीवरील कृत्ये करू नकोस, असेही त्यांनी सुनावले.
संपूर्ण महिला वर्ग तुझ्या वागण्यावर चिडलेला आहे, ‘आशिक बनाया’ सारख्या चित्रपटांमधून आम्ही तुला पाहिले आहे, त्यामुळे आता जास्त नाटक करू नकोस, असा इशारा पाल यांनी दिला. ‘तू कोणती चेटकीण आहेस का?’ असा उपहासात्मक सवाल करत, केवळ वादासाठी वेड्यासारखे वागणाऱ्या या महिलेला कुणीही फुटेज देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. आता यावर तनुश्रीची काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ST समाजाला नोव्हेंबर अखेरपर्यंत राजकीय आरक्षण मिळणार; आमदार गोविंद गावडे यांचा विश्वास
- पुण्यात म्हाडाच्या साडेचार हजार घरांसाठी लाखभर अर्ज; आता कागदपत्रांच्या बारकोड पडताळणीत नवा तांत्रिक पेच
- MPSC Protest: ‘आंदोलनाला जामर लावाल, आंबेडकरी विचारांना नाही’; सुजात आंबेडकरांचा सरकारवर घणाघात
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









