Share

ST समाजाला नोव्हेंबर अखेरपर्यंत राजकीय आरक्षण मिळणार; आमदार गोविंद गावडे यांचा विश्वास

गोव्यातील एसटी समाजाला नोव्हेंबर अखेरपर्यंत राजकीय आरक्षण देण्याचे आश्वासन सरकारने दिले असून, कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे आमदार गोविंद गावडे यांनी सांगितले.

Published On: 

ST reservation Goa Govind Gaude

पणजी, 11 ऑक्टोबर: गोव्यातील एसटी समाजाला येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत राजकीय आरक्षण (ST Reservation) मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने याबाबत आश्वासन दिले असून, आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती आमदार गोविंद गावडे यांनी दिली आहे.

या आरक्षणासाठी लागणारी आवश्यक मंजुरी मिळाली असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले. कायदेशीर कार्यवाहीसाठी काही काळ लागणार असला तरी, निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. नोव्हेंबरपर्यंत आरक्षण लागू झाल्यास त्याची योग्य अंमलबजावणी करणे शक्य होईल. मात्र, आरक्षण प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच निवडणुकांची घोषणा झाल्यास त्यावेळच्या परिस्थितीनुसार पुढील दिशा ठरवली जाईल, असे त्यांनी नमूद केले. सरकार आपले आश्वासन नक्की पाळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी याआधीही अनेक आंदोलने झाली आहेत. याच मुद्द्यावरून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना गावडे म्हणाले की, संविधानाने सर्वांना आंदोलनाचा अधिकार दिला आहे. आपल्या भावना मांडण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना कोणीही रोखू शकत नाही. आता समाजाला सरकारकडून हे आश्वासन पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही