MPSC आंदोलनातील १४ विद्यार्थ्यांवरील गुन्हे अन्यायकारक; रोहित पवारांचा आरोप

एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील १४ विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे अन्यायकारक असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

Published On: 

Rohit Pawar on MPSC paper leak

पुणे, 11 ऑक्टोबर: एमपीएससी आयोगातील कथित गैरव्यवहारांची चौकशी आणि अध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनातील १४ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करणे अन्यायकारक आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पोलिसांकडून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत त्यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

१ ऑक्टोबर रोजी स्पर्धा परीक्षार्थींशी चर्चा करून या आंदोलनाची सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला तीन हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या आंदोलनात आता मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत आहे. मात्र, या शांततापूर्ण आंदोलनाच्या आयोजन समितीतील १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी चार जण घटनास्थळी उपस्थित नसतानाही त्यांची नावे गुन्ह्यात समाविष्ट केल्याचा दावा पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे.

गुन्हा दाखल करण्यामागे पोलिसांकडून कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. आंदोलनस्थळी ड्रोन उडवल्याप्रकरणीही काही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय, मध्यरात्री वसतिगृहचालकांना नोटिसा बजावणे आणि विद्यार्थ्यांना आंदोलनात सहभागी न होण्यासाठी धमकावणे चुकीचे असल्याचे पवार म्हणाले. विद्यार्थ्यांना गुन्हेगार किंवा दहशतवादी असल्यासारखी वागणूक देऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

एमपीएससीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे मित्र असल्याने त्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जात नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सरकारमधील एकाही प्रतिनिधीने भेट न दिल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगीचे अनेक अर्ज दिले असून, त्यातील काही नाकारण्यात आल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा हे आंदोलन अधिक व्यापक केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. चर्चा करून तोडगा काढण्याऐवजी कारवाईचा मार्ग स्वीकारल्यास परिस्थिती अधिक चिघळू शकते, असेही ते म्हणाले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही