Job Opportunity | नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नोकरीची संधी, आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) डीन पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 5 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वाणी रोड, म्हसरूळ, नाशिक, पिनकोड- 422004

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1AsY_ezaYy2a862ml_PBB13cx9__Fr1Fu/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.muhs.ac.in/

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.