Mango Leaves | आंब्याची पाने पाण्यात उकळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Mango Leaves | टीम महाराष्ट्र देशा: आंबा बहुतेक लोकांना खायला आवडतो. आंब्याला फळांचा राजा असेही म्हणतात. आंब्यामध्ये भरपूर पोषक तत्व आढळून येतात, जे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. पण फक्त आंबाच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर नसतो तर त्याची पाने देखील आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरू शकतात. आंब्याच्या पानांमध्ये विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी अँटिऑक्सिडंट इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे आंब्याची पाने आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. यासाठी तुम्हाला एका भांड्यात 250 मिली पाणी घ्यावे लागेल. त्या पाण्यामध्ये तुम्हाला तीन आंब्याची पाने टाकून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळून घ्यावे लागेल. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यावर त्यामध्ये मध टाकून तुम्हाला त्याचे सेवन करावे लागेल. रोज सकाळी या पाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.

डायबिटीससाठी फायदेशीर (Beneficial for diabetes-Mango Leaves)

आंब्याची पाने उकळून प्यायल्याने मधुमेहाच्या रुग्णांना खूप फायदा होऊ शकतो. कारण यामध्ये अँथोसायनिडिन नावाचे टॅनिन असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही जर डायबिटीसचे रुग्ण असाल तर तुम्ही दररोज सकाळी या पाण्याचे सेवन केले पाहिजे.

रक्तदाब नियंत्रणात राहतो (Blood pressure remains under control-Mango Leaves)

आंब्याच्या पानांमध्ये हायपोटेन्सिव्ह गुणधर्म आढळून येतात, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. हे गुणधर्म रक्तवाहिन्या मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही जर रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय शोधत असाल, तर हे पाणी तुमच्यासाठी एक रामबाण उपाय ठरू शकतो.

पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Mango Leaves)

आंब्याची पाने उकळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पोटाच्या समस्यांवर मात करण्यासाठी आंब्याची पाने उकळून पिणे एक रामबाण उपाय आहे. याच्या सेवनाने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात. त्याचबरोबर हे पाणी प्यायल्याने पोट दुखी, गॅस यासारख्या समस्या सहज दूर होऊ शकतात.

आंब्याची पाने उकळून प्यायल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर त्वचेवरील जळजळ दूर करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

कोरफड (Aloevera-For Skin Irritation)

चेहऱ्यावरील जळजळ कमी करण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरू शकते. कोरफडीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेवरील जळजळ कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला कोरफडीचा गर थेट चेहऱ्यावर लावावा लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कोरफडीच्या गरामध्ये काही थेंब गुलाब जल मिसळू शकतात. कोरफडीच्या मदतीने तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो.

कडुलिंब (Neem-For Skin Irritation)

त्वचेवरील जळजळ दूर करण्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जाऊ शकतो. कडुलिंबामध्ये अँटी-फंगल गुणधर्म आढळून येतात, जे जळजळ आणि खाज कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला कडुलिंबाची पाने पाण्यामध्ये उकळून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या पाण्याने अंघोळ देखील करू शकतात. या पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेवरील बहुतांश समस्या सहज दूर होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.