Share

Job Opportunity | आयकर विभागात ‘ही’ रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात आयकर विभागाने (Income Tax Department) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रियेचे आयोजन केले आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया कर्नाटक आणि … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात आयकर विभागाने (Income Tax Department) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रियेचे आयोजन केले आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया कर्नाटक आणि गोवा विभागाच्या आयकर विभागात होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

आयकर विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 71 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये आयकर निरीक्षक पदाच्या 10 रिक्त जागा, मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या 29 जागा आणि कर सहाय्यक पदाच्या 32 रिक्त जागा उपलब्ध आहेत. ज्या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 24 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

आयकर आयुक्त (प्रशासन आणि TPS), प्रधान मुख्य आयकर आयुक्त, कर्नाटक आणि गोवा क्षेत्र, केंद्रीय महसूल इमारत, क्रमांक 1, क्वीन्स रोड, बेंगळुरू, कर्नाटक – 560001

जाहिरात पाहा (View ad)

https://incometaxbengaluru.org/circulars/NOTIFICATION%20FOR%20RECRUITMENT%20OF%20MERITORIOUS%20SPORTS%20PERSONS%20IN%20THE%20CADRE%20OF%20ITI,%20TA%20&%20MTS-2022-23.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://incometaxbengaluru.org/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही