Weather Update | पुढील पाच दिवस काय असणार तापमानाची स्थिती? जाणून घ्या हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या तापमानात (Temperature) मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. शेतकऱ्यांची रब्बी हंगामातली पिके अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. अशा परिस्थितीत वाढत्या तापमानामुळे शेतीतील पिकांना नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पुढील पाच दिवस बुलढाणा जिल्ह्यात कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर बहुतांश ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात बदल होण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा तडाका बसत आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांमध्ये उन्हाच्या झळा आणखीन वाढणार असल्याचा अंदाज (Weather Update) हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये तापमानाचा पारा वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. मार्च महिना अजून सुरू झाला नसला तरी तापमानाचा फार चांगलाच वाढत चालला आहे.

बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान (Weather Update) नोंदवण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे एवढे तापमान मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोंदवले जाते. मात्र यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच उष्णताची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे यावर्षी उष्णतेची तीव्र लाट येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घ्या (Take care of health in summer)

दरम्यान, या बदलत्या वातावरणात (Weather Update) नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करून शरीर हायड्रेट ठेवा. उन्हाळ्यात लिंबू पाणी, सरबत, ज्यूस इत्यादी गोष्टी प्या. त्याचबरोबर घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेऊनच बाहेर पडा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.