Share

Job Opportunity | मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min read Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

उच्च न्यायालय मुंबई यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 160 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये शिपाई आणि हमाल पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) पात्रताधारक इच्छुक उमेदवार दिनांक 7 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://bhc.gov.in/bhcpeonrecruitment2023/home.php

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/15LAHzYmHq3-NLzvpM0VTh7MQ2bLoa3YN/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://bhc.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या