Job Opportunity | महिलांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ बँकेत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. त्यामुळे अनेक संस्था महिलांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत आहे. महिलांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार या पदांसाठी फक्त महिला अर्ज करू … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. त्यामुळे अनेक संस्था महिलांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत आहे. महिलांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार या पदांसाठी फक्त महिला अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक महिला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) ट्रेनी लिपिक पदाच्या 49 जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करणारी महिला उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावी. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या महिला उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.

या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) इच्छुक महिला उमेदवाराचे वय 22 ते 33 वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील महिलांना वयामध्ये 2 वर्षाची सूट देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेतील तपशिलांबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक महिला उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) महिलांना दिनांक 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. अर्ज भरताना महिला उमेदवारांना 1180 रुपये शुल्क भरावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक महिला उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाइट

https://www.punebankasso.com/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही