Shubhaman Gill | ‘या’ खेळाडूंना मागे टाकत शुभमन गिलने पटकावलं ICC ‘प्लेयर ऑफ द मंथ’ विजेतेपद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shubhaman Gill | टीम महाराष्ट्र देशा: टीम इंडियातील स्टार फलंदाज शुभमन गिलने जानेवारी महिन्याचा ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ (ICC Player of the Month) जिंकला आहे. जानेवारी महिन्यामध्ये त्याने चमकदार कामगिरी केली होती. त्याने एकदिवसीय सामन्यामध्ये द्विशतक तर टी-20 सामन्यामध्ये शतक झळकावले होते. त्यानंतर आता तो जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू ठरला आहे. ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार पटकावण्याची ही त्याची पहिलीच वेळ आहे. त्याने जानेवारीमध्ये 567 धावा केल्या होत्या. शुभमन गिलने हा पुरस्कार वेगवान टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज आणि न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवेला मागे टाकत जिंकला आहे.

गेला महिना शुभमन गिलसाठी खूप चांगला होता. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये द्विशतक केले होते. त्याने या सामन्यात 159 चेंडूमध्ये 208 धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीनंतर भारतीय संघाने अवघ्या 12 धावांनी न्युझीलँडवर विजय मिळवला होता.

टी-20 क्रिकेटमध्ये शुभमन गिलचा बोलबाला

टी-20 क्रिकेटमध्ये शुभमन गिलचा बोलबाला होता. त्याने सहा टी-20 सामन्यांमध्ये 165.57 च्या स्ट्राईकरेटने 202 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतकही झळकावले आहे. गेल्या महिन्यात त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. शुभमन गिलने गेल्या महिन्यात 12 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 12 डावांमध्ये 750 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याने त्याच्या खेळामध्ये सातत्य दाखवले आहे. त्यामुळे त्याला आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

दरम्यान, सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. हा सामना 17 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर तिसरा कसोटी सामना इंदोर येथे खेळला जाणार आहे. तर या मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या