Share

जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा : आणखी 12 अधिकारी निलंबित, चौकशीची व्याप्ती वाढली

Jalna rain relief scam widens; 12 more officials suspended

Published On: 

40 crore Jalna Rain relief scam

जालना | प्रतिनिधी – जिल्ह्यातील तब्बल 40 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याची ( Jalna Scam ) व्याप्ती वाढत आहे. आज, 20 जून रोजी, जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत आणखी 7 तलाठी आणि 5 तहसील कार्यालयीन लिपिकांना निलंबित करण्यात आलं आहे. याआधीच 10 तलाठी निलंबित झालेले असून, एकूण निलंबितांची संख्या आता 22 झाली आहे.

या घोटाळ्यात 5 तहसीलदार आणि नायब तहसीलदारांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासे मागवण्यात आले असून, त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच, 35 तलाठ्यांविरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.

40 crore Jalna Rain relief scam

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. 2022 ते 2024 दरम्यान, अनेक प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांची बनावट नावे वापरून एकाच व्यक्तीला एकापेक्षा अधिक वेळा अनुदान दिलं गेलं. काही ठिकाणी तर जमिनीच नसतानाही शासकीय मदतीचा लाभ उचलण्यात आला.

या आर्थिक फसवणुकीचे धागेदोरे आता वरिष्ठ तहसील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. चौकशीत कार्यरत आणि तत्कालीन तहसीलदारांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे.

लॉगिन आणि पासवर्डचा गैरवापर

जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील प्रकरणं अधिक गंभीर आहेत. या ठिकाणी तहसीलदारांचे लॉगिन आणि पासवर्ड वापरून तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी अतिवृष्टी आणि गारपिट यामधील नुकसानभरपाईचा निधी स्वतःच्या फायद्यासाठी वळवला. ही माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 8 सदस्यीय विशेष चौकशी समिती नेमली होती.

ही समिती सध्या तपास करत असून, येत्या काही दिवसांत आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर असा शासकीय कर्मचाऱ्यांचा डल्ला पडल्यामुळे जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही