Job Opportunity | माहिती आणि जनसंपर्क महासंचालक नोकरीची संधी! ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार या पदांसाठी पात्रताधारक असणारे उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन अर्ज करू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

दिनांक 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने इच्छुक उमेदवारांना अर्ज पाठवणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

मा. महासंचालक वृत्त शाखा शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी तळमजला हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई, पिनकोड- ४०००३२

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1a5v2Nykk5UdjSuRvptUFiCe2YMyidq2g/view

अधिकृत वेबसाईट

https://dgipr.maharashtra.gov.in/

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.