Share

झीलंडविरुद्ध टीम इंडिया जाहीर; श्रेयस-सिराजची ‘घरवापसी’, पण वर्ल्ड चॅम्पियन शमीला पुन्हा डच्चू!

BCCI announces India’s squad for the New Zealand ODI series. Shubman Gill to lead, Shami ignored again, while Shreyas Iyer returns subject to fitness.

Published On: 

IND vs NZ - BCCI announces India's squad for the New Zealand ODI series. Shubman Gill to lead, Shami ignored again, while Shreyas Iyer returns subject to fitness.

पुणे – नवीन वर्ष, नवी मालिका… पण जुन्या जखमा आजही तशाच आहेत की काय? अशी शंका घेण्यास वाव आहे. भारतीय निवड समितीने नेहमीप्रमाणे चाहत्यांना धक्का देण्याची परंपरा कायम राखली आहे. बीसीसीआयने ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) वनडे मालिकेसाठी ‘टीम इंडिया’ची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या मालिकेची धुरा युवा शुभमन गिल (Shubman Gill) याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मधल्या फळीतील श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांची ‘घरवापसी’ झाली आहे. मात्र, इथे एक मोठा ट्विस्ट आहे. श्रेयस अय्यरला उपकर्णधारपद दिलं असलं तरी, त्याला आधी ‘फिटनेस टेस्ट’ पास करावी लागेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेली दुखापत बरी झाली असेल, तरच तो मैदानात उतरू शकेल, अन्यथा त्याला बाहेर बसावं लागेल.

ज्याने भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता, त्या मोहम्मद शमीकडे (Mohammad Shami) निवड समितीने पुन्हा एकदा पाठ फिरवली आहे. शमी शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता, पण त्यानंतर त्याला संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. इतकंच नाही तर, देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा ओढणाऱ्या देवदत्त पडिक्कल आणि ईशान किशनलाही निवड समितीने ‘वेटिंग लिस्ट’वरच ठेवलंय, हे बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

IND vs NZ Squad Announced

न्यूझीलंड विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ :  शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल.

  • 11 जानेवारी – पहिला एकदिवसीय सामना, वडोदरा
  • 14 जानेवारी – दुसरा एकदिवसीय सामना, राजकोट
  • 18 जानेवारी – तिसरा एकदिवसीय सामना, इंदूर
  • 21 जानेवारी – पहिला टी२०, नागपूर
  • 23 जानेवारी – दुसरा टी२०, रायपूर
  • 25 जानेवारी – तिसरा टी२०, गुवाहाटी
  • 28 जानेवारी – चौथा टी२०, विशाखापट्टणम
  • 31 जानेवारी – पाचवा टी२०, तिरुवनंतपुरम

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही