अमेरिकेचा इराणवर पुन्हा हल्ला अन् भारतात सोने-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; खरेदी करण्यापूर्वी नवे दर बघा!

मेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धसदृश परिस्थितीमुळे भारतात सोन्याचा दर १ लाख ५८,४४० रुपयांवर पोहोचला असून चांदीने २ लाख ७२ हजार पार केले आहेत.

Published On: 

Gold Silver Price: Stack of gold coins and silver bars reflecting the current market price surge

सामान्य माणसाने सोनं खरेदी करायचं की नाही, असा मोठा प्रश्न पडावा इतकी भयानक दरवाढ सध्या बाजारात पाहायला मिळतेय. आखाती देशात पुन्हा एकदा युद्धाचे ढोल वाजू लागल्याने सराफा बाजारात अक्षरशः मोठी खळबळ उडाली आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ अमेरिकी आणि इराणी सैन्यामध्ये पुन्हा एकदा चकमक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिका आणि इराणमधील शांतता करार फिस्कटल्याने जागतिक बाजारात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळेच सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकांनी सोन्याकडे मोर्चा वळवला असून भारतात सोन्या-चांदीच्या भावाने (Gold Silver Rates Today) आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

Gold Silver Rates Today

बुलियन असोसिएशनने २७ मे २०२६ रोजी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम तब्बल १ लाख ५८,४४० रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे हा दर जीएसटीशिवाय आहे. दुसरीकडे चांदीच्या दरानेही ग्राहकांना मोठा झटका दिला असून प्रतिकिलो चांदी थेट २ लाख ७२,६५० रुपयांवर गेली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमालीचा कमकुवत झाला आहे. त्यामुळे परदेशातून सोनं आयात करणं खूप महागलंय. त्यातच कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि युद्धाच्या भडक्यामुळे गुंतवणूकदार प्रचंड सावध झाले आहेत.

राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ५७,८७० रुपये झाला आहे. कालच्या म्हणजेच २६ मेच्या तुलनेत सोन्यात फार बदल झाला नसला, तरी चांदी मात्र एकाच दिवसात तब्बल १ हजार ८८० रुपयांनी महागली आहे.

आपल्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे? मुंबई, पुणे आणि नागपूर या तिन्ही प्रमुख शहरांमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ५८,२८० रुपये आहे, तर २२ कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना १ लाख ४५,०९० रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये हाच दर सर्वाधिक असून तिथे २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ५८,७४० रुपयांवर पोहोचला आहे. जोपर्यंत आखातातील हा तणाव कमी होत नाही, तोपर्यंत सोने-चांदीच्या किमतीत अशीच उलथापालथ सुरू राहील, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही