Share

१४७, १२४, ११३, १०८… आकडे बोलतायत! ५ सामन्यात ४ शतकं ठोकूनही ‘या’ पठ्ठ्याला टीम इंडियात ‘नो एन्ट्री’!

Despite scoring 4 centuries in his last 5 matches, Devdutt Padikkal remains ignored by selectors for the NZ series, sparking criticism from experts like Dilip Vengsarkar.

Published On: 

Despite scoring 4 centuries in his last 5 matches, Devdutt Padikkal remains ignored by selectors for the NZ series, sparking criticism from experts like Dilip Vengsarkar.

पुणे – क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभारूनही जर नशीब साथ देत नसेल तर काय करायचं? हा प्रश्न सध्या एका युवा भारतीय फलंदाजाला नक्कीच पडला असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली, श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराजची ‘घरवापसी’ झाली, पण ज्याने गेल्या महिनाभरात गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलंय, त्या देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) याच्याकडे निवड समितीने पुन्हा एकदा डोळेझाक केली आहे.

IND VS NZ – Devdutt Padikkal Dropped 

सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये देवदत्तने अक्षरशः धावांचा पाऊस पाडलाय. त्याचे शेवटचे ५ डाव बघा – १४७, १२४, २२, ११३ आणि १०८! ५ पैकी ४ सामन्यांत शतकं ठोकूनही निवड समितीचे दरवाजे उघडले नाहीत, हे पाहून क्रिकेट रसिकही अवाक झाले आहेत.

विजय हजारेच नाही, तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याने तमिळनाडूविरुद्ध खणखणीत शतक झळकावलं होतं. त्याचे शेवटचे १० डाव पाहिले तर त्यात तब्बल ५ शतकं आणि ७ वेळा ५० पेक्षा जास्त धावा आहेत. पडिक्कलची लिस्ट-ए मधील सरासरी ८२.५६ इतकी जबरदस्त आहे, तरीही त्याला (Devdutt Padikkal) बाकावरच बसावं लागतंय.

सध्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे ओपनिंग फिक्स आहेत. रोहितनंतर यशस्वी जैस्वालला पहिली पसंती मिळतेय. त्यामुळे टॉप ऑर्डरमध्ये जागाच शिल्लक नसल्याने पडिक्कलचा बळी जातोय का? अशी चर्चा आता रंगली आहे.

माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनीही या निवडीवर आश्चर्य व्यक्त केलंय. “सरफराज खान आणि देवदत्त पडिक्कलला संधी का मिळत नाही, हे मला समजत नाही. धरमशाला कसोटीत या दोघांनी इंग्लंडविरुद्ध काय कामगिरी केली होती, हे आपण पाहिलंय,” अशा शब्दांत वेंगसरकर यांनी निवड समितीला आरसा दाखवलाय. फॉर्म, टॅलेंट आणि आकडे सगळं काही बाजूला असतानाही देवदत्तला अजून किती वाट पाहावी लागणार, हाच खरा प्रश्न आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही