Share

एबी फॉर्म चावून खाल्ला तरी अर्ज मंजूर कसा? आयोगाने सांगितलं ‘ते’ कारण; पुण्यातला हायव्होल्टेज ड्रामा!

Pune Election Drama: Despite Uddhav Kamble tearing and allegedly swallowing the AB form, Machhindra Dhavale’s nomination was accepted by the EC. Here is why.

Published On: 

Pune Election Drama: Despite Uddhav Kamble tearing and allegedly swallowing the AB form, Machhindra Dhavale's nomination was accepted by the EC. Here is why.

पुणे : Pune Election – निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी मिळवण्यासाठी नेते काय करतील, याचा काही नेम नाही. पण पुण्यात जे घडलं, ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. एखाद्या उमेदवाराने रागाच्या भरात प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्म (AB Form) चक्क फाडून गिळला, तरीही त्या प्रतिस्पर्ध्याचा अर्ज मंजूर झालाच कसा? हा प्रश्न सध्या संपूर्ण पुणे शहराला पडलाय. आता खुद्द निवडणूक आयोगानेच यामागचं ‘लॉजिक’ उलगडून सांगितलं आहे.

पुण्यातील ( Pune Election ) प्रभाग क्रमांक ३६ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन गट आमनेसामने आले होते. उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे या दोघांमध्ये उमेदवारीवरून जुंपली होती. संतापलेल्या उद्धव कांबळे यांनी निवडणूक कार्यालयातच मच्छिंद्र ढवळेंचा एबी फॉर्म फाडला आणि गिळंकृत केल्याचा आरोप झाला होता. नियमानुसार फॉर्म फाटला तर उमेदवारी रद्द व्हायला हवी, अशी चर्चा होती.

मच्छिंद्र ढवळे यांचा अर्ज निवडणूक आयोगाने वैध ठरवला आहे. याबद्दल माहिती देताना निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, “उमेदवाराने एबी फॉर्म सादर केला होता. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांसमोरच दुसऱ्या व्यक्तीने तो फाडून नेला. ही घटना अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत घडल्याने, तो एबी फॉर्म संबंधित उमेदवाराकडून ‘जमा’ असल्याचे गृहीत धरण्यात आले.” त्यामुळे मच्छिंद्र ढवळे आता शिवसेनेचे (शिंदे गट) अधिकृत उमेदवार ठरले आहेत.

ज्या उद्धव कांबळे यांच्यावर फॉर्म गिळल्याचा आरोप झाला, त्यांनी मात्र निवडणुकीतून माघार घेतली आहे. “मी फॉर्म खाल्ला नाही, तर रागाच्या भरात फाडला. मच्छिंद्र ढवळेंनी माझा फॉर्म चोरला होता,” असा दावा कांबळे यांनी पोलिसांत आणि माध्यमांसमोर केला आहे.  एकंदरीत काय, तर पुण्यातल्या या ‘फॉर्म फाडाफाडी’च्या नाटकाचा शेवट मच्छिंद्र ढवळेंच्या उमेदवारीने झालाय, पण निवडणूक आयोगाच्या या निर्णयाची चर्चा मात्र राज्यभर रंगली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही