Share

कोकण हार्टेड गर्ल आई होणार? कुणालच्या ‘त्या’ वाक्याने सोशल मीडियावर खळबळ!

अंकिता वालावलकरच्या मकर संक्रांतीच्या व्हिडिओमधील संवादाने ती आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. कुणालने ‘चोर ओटी’चा उल्लेख करताच चाहते बुचकळ्यात पडले आहेत.

Published On: 

Ankita Walawalkar Pregnant? कोकण हार्टेड गर्लच्या व्हिडिओने चर्चांना उधाण

Ankita Walawalkar- लग्न झालं की चाहत्यांना आणि नातेवाईकांना सर्वात जास्त वेध कशाचे लागलेले असतात? बरोबर ओळखलंत… ‘गुड न्यूज’चे! सध्या सोशल मीडियावरच्या लाडक्या कपल्सपैकी एक असलेल्या अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांच्या बाबतीतही आता हेच घडताना दिसतंय. अंकिताच्या पहिल्या मकर संक्रांतीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय, पण चर्चा मात्र तिच्या संक्रांतीपेक्षा अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) आई होणार का? याचीच जास्त रंगली आहे.

Ankita Walawalkar Pregnant?

नुकतंच अंकिताने तिची लग्नानंतरची पहिली संक्रांत कोकणात साजरी केली. सासूबाईंच्या हट्टाखातर तिने तब्बल ३५० बायकांना बोलावून जंगी हळदी-कुंकू समारंभ उरकला. काळ्या रंगाचा लेहंगा, हलव्याचे दागिने आणि तोच रांगडा कोकणी अंदाज… सगळं काही जुळून आलं होतं. पण या व्हिडिओमधील कुणाल आणि अंकिताच्या संवादाने नेटकऱ्यांचे कान टवकारले आहेत.

या व्हिडिओमध्ये अंकिता गमतीने कुणालला म्हणते, “मी कुणालला सांगितलंय की हा मी ऑर्गनाईज केलेला शेवटचा इव्हेंट असू दे.” यावर कुणालने दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरलंय. कुणाल म्हणतो, “चोर ओटीचा इव्हेंट मी करणार…” यावर अंकितानेही लगेच त्याला पुष्टी देत, “मला तेच पाहिजे आहे, नाहीतर डोहाळ जेवणाला मी अशी असेन की तिथे फुलं लावा, इथे डेकोरेशन करा…” अशी फटकेबाजी केली.

आता हा संवाद केवळ मस्करीत होता की खरंच ‘दोनाचे तीन’ होणार आहेत, याची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. पण कुणालच्या तोंडून आलेला ‘चोर ओटी’ आणि अंकिताचा ‘डोहाळ जेवण’ हा उल्लेख चाहत्यांना हिंट देण्यासाठी पुरेसा ठरला.

सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडलाय. एका युजरने थेट लिहिलंय, “एकंदरीत बोलण्यावरून असं दिसतंय की दोनाचे तीन होणार लवकरच.” तर काहींनी अंकिताला आतापासूनच शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. अंकिताचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) वर धुमाकूळ घालतोय. आता ही गुड न्यूज नक्की कधी अधिकृतपणे समजणार, याकडेच सगळ्या कोकणवासीयांचं लक्ष लागलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही