महिलांना ३३ नव्हे, तर ५० टक्के आरक्षण द्या; सीजेपी नेते अभिजीत दिपके यांची भाजपकडे मागणी

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सीजेपी नेते अभिजीत दिपके यांनी भाजपकडे महिलांना ३३ टक्क्यांऐवजी थेट ५० टक्के आरक्षण देण्याची मोठी मागणी केली आहे.

Published On: 

Abhijeet Dipke criticizes PM Narendra Modi on instagram video

प्रतिनिधी, २७ नोव्हेंबर: केंद्र सरकारने संसदेचे चार दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले असून, यात महिला आरक्षण विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी मोठी मागणी केली आहे. महिलांना ३३ टक्क्यांऐवजी थेट ५० टक्के आरक्षण मिळावे, अशी भूमिका त्यांनी एका कार्यक्रमात मांडली. महिलांची लोकसंख्या अर्धी असल्याने त्यांना प्रतिनिधित्वही अर्धेच मिळायला हवे, असे ते म्हणाले.

दिपके यांनी या आरक्षणाची अंमलबजावणी आगामी विधानसभा निवडणुकांपासूनच करण्याची मागणी राजकीय पक्षांकडे केली आहे. संसदेत जे होईल ते होईल, पण भाजपने आगामी निवडणुकांमध्ये किती महिलांना तिकीट देणार हे आधी जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले. तसेच, उत्तर प्रदेश आणि पंजाब निवडणुकीत सर्वच पक्षांनी ५० टक्के जागांवर महिला उमेदवारांना तिकीट द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली. त्यांच्या या भूमिकेला कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे.

संसदेचे हे विशेष अधिवेशन ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेत तर ०२ डिसेंबर रोजी राज्यसभेत होणार असून ते ०३ डिसेंबरला संपेल. या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयक मांडले जाण्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही विधेयकांना आवश्यक बहुमत मिळवण्यात सरकारला यश आल्याचे बोलले जात आहे. यासाठी काही विरोधी पक्षांचे मन वळवण्यात भाजपला यश आल्याचे मानले जात आहे.

या विधेयकांमुळे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच, लोकसभेच्या विद्यमान ५४३ जागा वाढून त्या कमाल ८५० होण्याची शक्यता आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही