पुणे, 22 नोव्हेंबर: पुणे-नगर रस्त्यावरून विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर रात्रीच्या वेळी नागरिकांना अडवून लुटणाऱ्या टोळीतील एका आरोपीला येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील तब्बल ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.
रेहान अश्रफ शेख (वय १९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ९ नोव्हेंबर रोजी रात्री विमानतळाकडे जाणाऱ्या एका तरुणाला अडवून मारहाण करण्यात आली होती. यावेळी चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाईल, सोन्याची अंगठी आणि २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
या घटनेनंतर संबंधित तरुणाने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत येरवडा पोलिसांनी परिसरातील ४० सीसीटीव्ही कॅमेरे बारकाईने तपासले. त्या आधारे रेहानची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यात आले. सध्या या टोळीतील इतर साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. रात्रीच्या अंधारात घडणाऱ्या या लूटमारीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- राजा भिंगे हत्या प्रकरणात पोलिसांचे मोठे यश; सर्व ५ आरोपींना अटक, ‘गुजरात’ कनेक्शन उघड
- ध्रुव जुरेलने शॉर्ट लेगवर टिपला अफलातून झेल, न्यूझीलंडचा हेन्री निकोल्स बाद
- आयपीएल २०२७: मिनी लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादसाठी मोठी बातमी; पॅट कमिन्स खेळण्यास उपलब्ध








