पुण्यात ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला; मनोज जरांगेंवर गंभीर आरोप

पुण्यात ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला. आरती मारणे नावाच्या महिलेकडून मारहाण; मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा कोंडे यांचा दावा.

Published On: 

Manoj Jarange Patil protest mandap removed in Antarwali Sarati Jalna

प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: पुण्यात ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा हल्ला मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरूनच झाल्याचा गंभीर आरोप स्वतः रेखा कोंडे यांनी केला आहे.

आरती मारणे नावाच्या महिलेने आपल्याला मारहाण केली असून ती जरांगे यांची समर्थक असल्याचा दावा कोंडे यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलत असल्यानेच हा भ्याड हल्ला करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मनोज जरांगे यांनी आपल्या अंगावर ‘भाड्याच्या, बिनबुडाच्या आणि विकृत’ महिला सोडल्याचा आरोप कोंडे यांनी केला. दरम्यान, कोंडे यांनी आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करून जरांगे यांची बदनामी केल्याचा आरोपही झाला होता. मात्र, हे आरोप पूर्णपणे खोटे, चुकीचे आणि जाणीवपूर्वक केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या संपूर्ण प्रकरणाला आपण कायद्यानेच चोख उत्तर देणार असल्याचे सांगत, रेखा कोंडे यांनी याप्रकरणी पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल केली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही