ओतूर, 21 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सध्या थांबलेली असतानाच, आज जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे राज्यव्यापी सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि अमोल कोल्हे हे नेते एकाच मंचावर येणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते नियोजित होते, मात्र ते या अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीत.
शरद पवार सध्या बारामतीत असल्यामुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकणार नाहीत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते काही दिवस रुग्णालयात होते. रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर ते सध्या विश्रांती घेत आहेत. पवारांच्या अनुपस्थितीत भुजबळ, वळसे पाटील आणि कोल्हे यांची एकत्र उपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, या मंचावर दोन्ही गटांशी संबंधित काही राजकीय चर्चा होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. मात्र, यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य करत स्पष्टीकरण दिले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नसून, ‘ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी तो विषय आमच्यासाठी संपला आहे,’ असे सुळे यांनी म्हटले होते.
दुसरीकडे, रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा वाद चर्चेत आला आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांनी श्रीवर्धन मतदारसंघावर दावा सांगितल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचे नाव न घेता त्यांना खोचक टोला लगावला. सगळ्याच मतदारसंघांवर दावा केला तरी आपल्याला काही फरक पडत नाही, यासाठी काळजी करण्याची गरज नाही. अगदी सातही जागांवर दावा केला तरी मला काहीही फरक पडणार नाही, असे जशास तसे उत्तर तटकरे यांनी दिले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- रोहित-विराटचा वनडे वर्ल्ड कपचा मार्ग मोकळा; आगरकर प्रकरणानंतर निवड समितीने रिस्क घेणे टाळले
- रायझिंग स्टार आशिया कप: पाकिस्तानला धुण्यासाठी ‘इंडिया ए’ सज्ज, जाणून घ्या सामन्याची वेळ आणि लाईव्ह स्ट्रीमिंग
- पत्नीने माहेरच्यांसोबत मिळून केली होती पतीची हत्या; तब्बल सात वर्षांनंतर न्यायालयाने सुनावली जन्मठेप








