‘मुली मुलांवर नाही, तर पैशांवर प्रेम करतात’, इंदुरीकर महाराजांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

मीरा भायंदर येथील दीपोत्सव कार्यक्रमात कीर्तन करताना ज्येष्ठ कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी मुली मुलांवर नाही तर पैशांवर प्रेम करत असल्याचं वादग्रस्त विधान केलं आहे.

Published On: 

Indurikar Maharaj controversial statement about girls loving money

प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: महाराष्ट्रातील कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी असेच एक वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला आहे. ‘मुली मुलांवर प्रेम करत नाहीत, त्या फक्त पैशांवर प्रेम करतात’, असे विधान त्यांनी केले आहे. मीरा भायंदर येथे एका दीपोत्सव कार्यक्रमासाठी त्यांना बोलावण्यात आले होते, याच कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले असून यावरून त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे.

कीर्तनादरम्यान तरुणांना उद्देशून बोलताना महाराज म्हणाले की, “जगात प्रेम वगैरे काही नसतं. जे म्हणतात की मला प्रेयसी आहे, ते मूर्ख आहेत. जर एखाद्या मुलाला वाटत असेल की पोरगी त्याच्यावर प्रेम करते, तर त्या पोराच्या तीन शिरा (नसा) चॉकअप आहेत असे समजावे.” मुली कधीच मुलांवर प्रेम करत नाहीत, तर त्या नेहमी पैशांवर प्रेम करतात, असे ते म्हणाले. त्यांनी आपली प्रेमाची व्याख्या सांगताना पुढे म्हटले की, “लव्ह इज अ मनी अँड मनी इज ए लव्ह… मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज मनी.”

आपले म्हणणे पटवून देण्यासाठी त्यांनी एका महाविद्यालयीन तरुणाचा किस्सा सांगितला. एका तरुणाने आपल्या मित्राला सांगितले की, ‘येत्या सोमवारी माझे लव्ह मॅरेज आहे. ती माझ्या कॉलेजमधली प्रेयसी असून मी तिच्याशिवाय एक मिनिटही राहू शकत नाही.’ असे सांगून त्याने मित्राला लग्नाला बोलावले. त्यावर मित्राने आपण सोमवारी लग्नाला येऊ शकत नसल्याचे सांगत मंगळवारी आशीर्वाद देण्यासाठी येईन असे स्पष्ट केले.

दुसऱ्या दिवशी, म्हणजेच मंगळवारी जेव्हा मित्र आशीर्वाद देण्यासाठी पोहोचला, तेव्हा ज्याचे सोमवारी लग्न होते तो तरुण दाढीला हात लावून शांत बसला होता. मित्राने विचारपूस केल्यावर त्याने ही ‘अवघड केस’ असल्याचे सांगितले. नक्की काय झाले असे विचारल्यावर तो तरुण म्हणाला की, काल आपले लग्नच झाले नाही. आम्ही काल बागेत दोन-तीन तास गप्पा मारल्या. तिथे १२ आईस्क्रीमच्या कांड्या खाल्ल्या आणि ९ ग्लास उसाचा रस प्यायलो. पण जाताना तिने मला बँकेत किती पैसे आहेत असे विचारले. मी २५ हजार असल्याचे सांगितले. एवढे कमी पैसे बघून ती मुलगी तिथून निघून गेली.

यावर मित्राने त्याला सल्ला दिला की, ‘तू तिला सांगायचे होते की तुझ्या चुलत्याच्या खात्यात २५ लाख रुपये आहेत, त्यांना मुले नाहीत आणि ते सगळे पैसे तुलाच मिळणार आहेत.’ यावर त्या तरुणाने उत्तर दिले की, “हेच मी तिला सांगितले होते, पण ते ऐकल्यानंतर ती प्रेयसी चुलत्यासोबतच निघून गेली.” इंदुरीकर महाराजांनी सांगितलेला हा किस्सा आणि त्यांचे मुलींबद्दलचे विधान यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही