रुग्णालयातूनच अवघ्या तीन दिवसांत मिळणार बाळाचा जन्मदाखला; पालिकेत खेटे मारण्याची गरज संपली

नवजात बाळाच्या जन्मदाखल्यासाठी आता पालिकेत हेलपाटे मारण्याची गरज नाही. अवघ्या तीन दिवसांत संबंधित रुग्णालयातूनच प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा सुरू झाली आहे.

Published On: 

Newborn birth certificate issued directly from hospital in three days

प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: नवजात बालकांच्या जन्मदाखल्यासाठी आता पालकांना पालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची आवश्यकता उरणार नाही. ज्या रुग्णालयात बाळाचा जन्म होईल, तिथूनच अवघ्या तीन दिवसांत जन्मप्रमाणपत्र देण्याची नवी सोय करण्यात आली आहे.

सध्या ही सुविधा चार प्रमुख आणि १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी संबंधित रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांना जन्म-मृत्यू नोंदणीचे अधिकार देण्यात आले असून, नोंदणी प्रक्रियेसाठी रुग्णालयांना स्वतंत्र लॉग-इन आयडी दिला जाणार आहे.

यापूर्वी बाळाच्या जन्मानंतर रुग्णालयाच्या हद्दीतील पालिका कार्यालयात जाऊन पालकांना अर्ज करावा लागत असे. त्यानंतर प्रमाणपत्र हातात पडण्यासाठी साधारण महिना ते दीड महिन्याचा कालावधी लागायचा आणि त्यासाठी वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या.

शाळा प्रवेश आणि विविध सरकारी कामांसाठी जन्मदाखल्याची मोठी आवश्यकता असते. मात्र, आता नव्या सुविधेमुळे पालकांना जन्मदाखल्यासाठी स्वतंत्र अर्ज किंवा पाठपुरावा करावा लागणार नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून भारताच्या रजिस्ट्रार जनरल यांनी या प्रक्रियेला मंजुरी दिली असून, यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ व जलद होणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही