आईचा विनयभंग केल्याचा राग, दौंडमध्ये तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; दोघांना अटक

दौंड तालुक्यातील सोनवडी गावात आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Published On: 

MHD LOGO

दौंड, 17 नोव्हेंबर: दौंड तालुक्यातील सोनवडी गावात एका ३१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अडीच महिन्यांपूर्वी आईचा विनयभंग केल्याच्या रागातून हा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी दौंड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

अरुण अनिल पवार (वय ३१) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (१६ नोव्हेंबर) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास अरुण कॉर्डलाईन ते पवार पॅलेस रस्त्यावरून एकटाच जात होता. यावेळी आरोपींनी त्याला गाठून त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने गंभीर वार केले. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अरुणचा मृत्यू झाला.

सुमारे दोन ते अडीच महिन्यांपूर्वी मयत अरुणने आरोपी दिनेश विजय पवार (वय २०) याच्या आईचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या कारणावरून दिनेशच्या मनात प्रचंड राग होता. यातूनच दिनेशने त्याचा साथीदार रुपेश मिथुन राठोड याच्यासोबत संगनमत करून या खुनाचा कट रचल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हे दोन्ही आरोपी सोनवडी येथीलच रहिवासी आहेत.

या घटनेनंतर सुनील अनिल पवार (वय ३३, रा. सोनवडी) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत दिनेश पवार आणि रुपेश राठोड या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही