रत्नागिरी, 17 नोव्हेंबर: परदेशी जहाजाला पोर्ट क्लिअरन्स आणि चाचण्यांची परवानगी देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रत्नागिरीत मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी (वर्ग-१) संदीप भुजबळ यांच्यासह एका खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका परदेशी जहाजाला आवश्यक परवानग्या आणि प्रमाणपत्र देण्यासाठी संदीप भुजबळ यांनी तब्बल ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोड झाल्यानंतर हा व्यवहार ६० हजार रुपयांवर निश्चित झाला होता. यानंतर तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत अधिकृत तक्रार दाखल केली.
या तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने रत्नागिरीतील हॉटेल कार्निवल येथे सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना मिलिंद बनप या खासगी पंटरला पथकाने रंगेहाथ पकडले.
मिलिंद बनप याला ताब्यात घेतल्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीनंतर मुख्य अधिकारी संदीप भुजबळ यांनाही एसीबीने बेड्या ठोकल्या. या धडक कारवाईमुळे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिवसेना सुनावणी: ॲड. ध्रुव मेहतांचा युक्तिवाद; योगेश कदम ते दादा भुसेंच्या सह्यांचा उल्लेख
- रोहित पवारांच्या ‘मफलर मॅन’ आरोपावर एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवर पलटवार
- जो आपल्याला नडतो, त्याला टप्प्यात आल्यावर डोक्यावर टाकतोच, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचा सूचक इशारा








