संथ षटक गतीमुळे श्रीलंकेला फटका, ICC ने कापले १५ WTC गुण; पाकिस्तानवरही कारवाई

पहिल्या कसोटीत संथ षटक गती राखल्याचा फटका श्रीलंका आणि पाकिस्तानला बसला असून आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे (WTC) गुण कापले आहेत.

Published On: 

ICC WTC points deducted for Sri Lanka and Pakistan cricket teams

प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संथ षटक गती (Slow Over Rate) राखल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांवर कारवाई केली आहे. या दंडात्मक कारवाईमुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) गुणतालिकेत श्रीलंकेला मोठा फटका बसला आहे.

संथ षटक गतीबद्दल आयसीसीने श्रीलंकेचे तब्बल १५ मौल्यवान गुण वजा केले आहेत. या मोठ्या कारवाईनंतर श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरला आहे. तसेच, त्यांच्या गुणांची टक्केवारी ३३.३३ टक्क्यांवरून थेट १५.४७ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

याच पहिल्या कसोटीत संथ षटक गती राखल्याने पाकिस्तान संघालाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. आयसीसीने पाकिस्तानचे पाच गुण कमी केले असून, यामुळे त्यांचा संघ WTC गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर म्हणजेच सर्वात तळाला फेकला गेला आहे. या पाच गुणांच्या कपातीनंतर पाकिस्तानची गुण टक्केवारी आता केवळ ३.३३ टक्के इतकीच उरली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही