ओमान, 14 नोव्हेंबर: ओमानमध्ये खेळवल्या गेलेल्या १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ च्या (U19 Asia Cup) अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा थरारक पराभव केला आहे. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी ३ धावांची गरज असताना मोहित उलवाने मारलेल्या खणखणीत चौकारामुळे भारताने नवव्यांदा आशिया कपच्या विजेतेपदावर नाव कोरले.
अल अमिरात येथील मिनिस्ट्री टर्फ-२ मैदानावर हा अंतिम सामना पार पडला. विजयासाठी ३३८ धावांचे विशाल लक्ष्य गाठताना शेवटच्या षटकात भारताला ८ धावांची आवश्यकता होती. पाकिस्तानी स्पिनर अहमद हुसेन हा गोलंदाजी करत होता. शेवटचा १ चेंडू आणि ३ धावा अशी रंगतदार स्थिती असताना स्ट्राइकवर असलेल्या मोहित उलवाने थेट बाऊंड्री मारून भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. यावेळी नॉन-स्ट्रायकरवर चिगुरपती वेंकटा उभा होता. या ऐतिहासिक विजयासह भारताने साखळी फेरीतील पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली.
तत्पूर्वी, या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानने ९ गडी गमावून ३३७ धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा सलामीवीर उस्मान खान याने ११ चेंडूंच्या खेळीत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०७ धावांचे शतक झळकावले.
उस्मान व्यतिरिक्त अब्दुल कादिर आणि कर्णधार फरहान युसूफ यांनीही महत्त्वपूर्ण अर्धशतके केली. कादिरने ५४ चेंडूंचा सामना करताना ३ चौकार आणि ८ षटकारांसह ८० धावांची स्फोटक खेळी साकारली. तसेच कर्णधार फरहानने ६० चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ३ षटकार लगावत ६३ धावांचे योगदान दिले. मात्र, भारताच्या युवा संघाने हे मोठे आव्हान यशस्वीपणे पार करत पाकिस्तानचे आशिया कप जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर-१९: २०२६ च्या आशिया चषक विजयासह १९८८ पासूनचा संपूर्ण रेकॉर्ड
- “अद्याप वडिलांशी बोललो नाही”: U19 आशिया कपमध्ये ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरल्यानंतर आर्यवीर सेहवागची प्रतिक्रिया
- IND vs PAK : १६ चेंडूत २९ धावांची गरज, ९ विकेट पडल्यानंतर १० व्या नंबरच्या बॅटरने मिळवून दिला थरारक विजय








