प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: अंडर-१९ आशिया चषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर १ गडी राखून थरारक विजय मिळवला आहे. पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेल्या ३३८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज होती. या दबावाच्या क्षणी युवा खेळाडू मोहित उलवा याने खणखणीत चौकार ठोकत टीम इंडियाला विजेतेपद मिळवून दिले.
या रोमहर्षक सामन्यानंतर सर्वांचे लक्ष वेधून घेणारा मोहित उलवा हा सौराष्ट्रच्या वयोगट क्रिकेटमधून पुढे आला आहे. त्याने गुजरातच्या जामनगर येथील ‘क्रिकेट बंगलो’ अकादमीमध्ये महेंद्र सिंग चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. विशेष म्हणजे, याच महेंद्र सिंग यांनी भारताचा स्टार क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यालाही प्रशिक्षण दिले आहे.
सुरुवातीच्या काळात टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या मोहितला त्याच्या वडिलांनी व्यावसायिक क्रिकेटकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देत अकादमीत पाठवले. त्याचे वडील रेल्वेमध्ये आरपीएफ पोलीस म्हणून कार्यरत आहेत. अकादमीत आल्यावर मोहित सुरुवातीला ऑफ स्पिन गोलंदाजी करत असे. मात्र, त्याची उंची आणि धावण्याचा वेग पाहून प्रशिक्षकांनी त्याला वेगवान गोलंदाजी (पेस बॉलिंग) करण्याचा सल्ला दिला. देशांतर्गत स्पर्धांमध्ये आपल्या फलंदाजीचे आणि दबावाखाली खेळण्याचे कौशल्य दाखवून देणाऱ्या मोहितने आता आशिया चषकाच्या अंतिम फेरीतही स्वतःला सिद्ध केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “अद्याप वडिलांशी बोललो नाही”: U19 आशिया कपमध्ये ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरल्यानंतर आर्यवीर सेहवागची प्रतिक्रिया
- IND vs PAK : १६ चेंडूत २९ धावांची गरज, ९ विकेट पडल्यानंतर १० व्या नंबरच्या बॅटरने मिळवून दिला थरारक विजय
- मोहित उलवाचा विजयी चौकार! U19 आशिया कप फायनलमध्ये भारताचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय, चाहत्यांचा जल्लोष







