प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: गणेश नाईक यांनी केलेल्या टीकेला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या विभागाच्या कामकाजात नाईकांनी हस्तक्षेप करू नये, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाची आपल्याला कोणतीही आवश्यकता नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
मंत्री म्हणून आपल्या विभागाचे निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला असल्याचे सामंत यांनी नमूद केले. या निर्णयांची माहिती फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच देण्यास आपण बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “वनविभागात काही गोष्टी करत असतील तर त्यांनी मला सांगावे अशी अपेक्षा असू नये,” असेही सामंत म्हणाले.
प्रकल्पांबाबत काही शंका किंवा आक्षेप असतील, तर नाईकांनी पत्रकार परिषदेतून बोलण्याऐवजी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ते दूर करावेत, असा सल्ला सामंत यांनी दिला. पालकमंत्री असल्यामुळे प्रत्येक प्रकल्पाची माहिती मिळायलाच हवी, या गणेश नाईकांच्या भूमिकेशी आपण सहमत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण आणि शिवसेनेच्या एकत्रीकरणाच्या चर्चांवरही सामंत यांनी भाष्य केले. पक्षाचे धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून, ते अधिकार उदय सामंत यांना दिलेले नाहीत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना विराटची आठवण आली; आर. अश्विनची मोठी कबुली
- गोकुळ निवडणुकीत सतेज पाटलांनी मते चोरली; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खळबळजनक आरोप
- सूर्यकुमार यादवचं दणदणीत कमबॅक! १५ चेंडूत अर्धशतक झळकावत श्रेयस अय्यरला दिला धोक्याचा इशारा







