पुणे, 13 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत झालेल्या आमदारांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ही कोणतीही अधिकृत पक्षाची बैठक नसून केवळ एक सदिच्छा भेट होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
दिवाळीनंतर सुनेत्रा पवार यांची भेट झाली नव्हती. तसेच त्या आजारी होत्या, त्यामुळे आमदारांनी त्यांची भेट घेतल्याचे भरणे यांनी सांगितले. या भेटीत विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बोलणे झाल्याच्या चर्चा त्यांनी ठामपणे फेटाळून लावल्या. “आज विलिनीकरणाची कोणतीही चर्चा झालेली नाही,” असे भरणे यांनी स्पष्ट केले.
विलीनीकरणाबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आमदारांनी यापूर्वीच सुनेत्रा पवार यांना दिले आहेत, त्यामुळे हा विषय तेव्हाच संपला आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच, आमदारांमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नसून सर्वजण सुनेत्रा पवारांच्या निर्णयाला बांधील राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- सुनील तटकरेंना ‘व्हिलन’ का ठरवताय? विलिनीकरणाच्या चर्चेवर आदिती तटकरेंनी दिली वडिलांची साथ
- मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला; रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा
- पुण्यात पार्थ पवारांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर आमदारांनी दिले थेट उत्तर








