दोन्ही शिवसेना एकत्र येणार? विलिनीकरणाच्या चर्चेवर मंत्री उदय सामंत यांचे थेट उत्तर

दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चेवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली असून, विलिनीकरणाचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदेच घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Published On: 

Uday Samant speaking at a press conference regarding the political dispute

प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या भेटीगाठींच्या सत्रामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना मोठे उधाण आले आहे. एकीकडे दोन्ही गटांतील काही नेते या चर्चा फेटाळून लावत असतानाच, आता दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चांचे पडघम वाजू लागले आहेत. शिंदे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आपल्याला सर्वाधिक आनंद होईल, असे मत व्यक्त केले होते. या सर्व राजकीय घडामोडींवर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी थेट उत्तर दिले आहे.

शिवसेनेच्या विलिनीकरणाबाबत सामंत यांनी स्पष्ट केले की, निंबाळकर यांचे ते वैयक्तिक मत आहे. “एकत्रित यायचे की नाही हे ठरवण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांचा आहे. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. कुणी कुणासोबत जायचे यावर मी मत मांडले, तरी माझ्यापेक्षा ‘हायर ऑथॉरिटी’ शिंदे साहेब आहेत. त्यामुळे विलिनीकरण किंवा एकत्र येण्याच्या मुद्द्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. या धोरणात्मक निर्णयावर एकनाथ शिंदे हेच बोलतील आणि तेच निर्णय घेतील,” असे सामंत यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सर्वमान्य असल्याचे सांगत सामंत म्हणाले की, त्यांच्यामुळेच आपल्याला उद्योगमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. शिंदे साहेबांनी आपला चेहरा महाराष्ट्रासमोर आणला आणि त्यांच्यामुळे अनेक नेते पुढे आले. मात्र, काही लोकांना ते दिसत नाही आणि कळतही नाही. त्यावर जास्त बोलण्यापेक्षा पुढे जाणे योग्य असल्याचे ते म्हणाले. यावेळी शिंदे यांच्या साधेपणाचा दाखला देताना, जालन्यात एका झोपडीत जाऊन शिंदे साहेबांनी जेवण केले, तिथली कांदाभाकर खाल्ली आणि लोकांशी चर्चा केली, हे सामंत यांनी आवर्जून सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही