प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: जमीन किंवा घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दस्त नोंदणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आता सर्व पक्षकारांचे आधार प्रमाणीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. या नव्या बदलामुळे व्यवहारादरम्यान हमीदार, ओळखीची व्यक्ती किंवा कोणत्याही साक्षीदाराची गरज उरलेली नाही. परिणामी, बोगस व्यवहार करणाऱ्या दलालांना मोठा चाप बसणार आहे.
यापूर्वी दस्त नोंदणी करताना अंगठ्याचा ठसा (थंब) न जुळल्यास दोन साक्षीदार उभे करून व्यवहार पूर्ण करण्याची सोय होती. मात्र, या पळवाटेचा गैरफायदा घेत जमिनीच्या खरेदी-विक्रीत फसवणूक आणि बोगस व्यवहारांचे प्रमाण वाढले होते. याला आळा घालण्यासाठी सरकारने साक्षीदाराची सोयच बंद केली आहे. नव्या नियमानुसार, जोपर्यंत फिंगरप्रिंटद्वारे प्रमाणीकरण होत नाही, तोपर्यंत कोणताही दस्त नोंदवला जाणार नाही.
या डिजिटल पडताळणी प्रक्रियेसाठी पक्षकारांकडे अँड्रॉईड ९.० (Android 9.0) किंवा त्यापुढील अद्ययावत स्मार्टफोन, इंटरनेट सुविधा आणि अधिकृत आधार ॲप असणे आवश्यक आहे. नागरिकांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्यापूर्वीच मोबाईलमधील आधार ॲपच्या माध्यमातून नोंदणीचे सोपस्कार पूर्ण करावेत, जेणेकरून प्रक्रियेत होणारा विलंब टाळता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत होत असून यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या कष्टाचा पैसा सुरक्षित राहणार आहे. मात्र, दुसरीकडे दुय्यम निबंधक कार्यालये आणि तेथील यंत्रणा अद्ययावत करण्याची मागणीही होत आहे. सध्या अनेक कार्यालये अत्यंत कोंदट असून तिथे सोयी-सुविधांचा अभाव आहे. अशा कोंडवाड्यासारख्या कार्यालयांत नवीन नियमांची अंमलबजावणी करणे आव्हानात्मक असले, तरी फसवणूक टाळण्यासाठी हा बदल आवश्यक असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- माझा फोन टॅप होतोय, पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान
- सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याच अपहरणाचा कट होता, अमित देशमुखांचा खळबळजनक आरोप
- रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, २०५ डावांनंतर पहिल्यांदाच ठरला ‘गोल्डन डक’चा शिकार
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








