लातूर, 13 नोव्हेंबर: लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एका मतदाराच्या अपहरण नाट्यानंतर आता थेट राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याच अपहरणाचा कट रचल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखीनच तापले आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे काही दिवसांपूर्वी जिल्हा बँक निवडणुकीतील एका मतदाराला पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर अमित देशमुख यांनी हा गंभीर आरोप केला. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे आमच्या ‘सहकार पॅनल’मधून निवडणूक लढवत आहेत. विरोधकांनी त्यांनाच पळवून नेण्याचा प्लॅन बनवला होता. मात्र, आम्ही हे कसं होऊ देणार, असा इशारा देशमुख यांनी विरोधकांना दिला.
या निवडणुकीतील बहुमताच्या आकड्यावर बोलताना देशमुख यांनी कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील राजकीय घडामोडींचा दाखला दिला. केवळ काठावरचे बहुमत मिळवून उपयोग नाही, तर स्पष्ट बहुमत मिळवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. याशिवाय, निवडणुकीत विरोधी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने सहकारी संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. पक्षीय राजकारणापेक्षा सहकाराची तत्त्वे जपणे जास्त महत्त्वाचे आहे. कमळ, हात, घड्याळ किंवा धनुष्यबाण या चिन्हांपेक्षा सहकाराचे हित मोठे असल्याचे ते म्हणाले. तसेच, लातूरच्या भल्यासाठी होणाऱ्या मतदानातून मुंबई आणि दिल्लीपर्यंत स्पष्ट संदेश गेला पाहिजे, असे आवाहनही अमित देशमुख यांनी केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळांचे थेट विधान; म्हणाले, ‘मर्जरच्या खेळाचे नियम…’
- विराट कोहलीची सचिन तेंडुलकरच्या नकोशा विक्रमाशी बरोबरी; वनडेत सर्वाधिक ‘डक’चा विक्रम
- हवामान बदलानुसार प्रकृतीची काळजी कशी घ्यावी? आजारपण टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या महत्त्वाच्या टिप्स
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








