पुणे, 13 नोव्हेंबर: राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून, अनेक नेते सातत्याने शरद पवारांच्या भेटी घेत आहेत. या घडामोडींवर भाष्य करताना, आपण विलिनीकरणाच्या एका बैठकीला उपस्थित होतो आणि १८ जानेवारीला झालेल्या त्या बैठकीत एकत्र येण्यावर एकमत झाले होते, असा मोठा खुलासा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.
या विलिनीकरणाच्या चर्चेवर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ‘योग्य वेळी योग्य निर्णय होतील,’ असे सूचक विधान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांनी केले आहे. तर दुसरीकडे, ‘माझा भाऊ गेला, तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,’ अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी नोंदवली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, विलिनीकरणाच्या बैठकीत अजितदादांची भूमिका एकत्र येण्याचीच होती. अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या असल्या तरी, त्यावेळी एकत्र येण्याचे ठरले होते ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच मागील निवडणुका एकत्रितपणे लढल्या गेल्या. ‘दुर्दैवाने दादांचा अपघात झाला. त्याचे खूप दुःख असून आजही पावलोपावली त्यांची आठवण येते. पण दादानंतर आजची परिस्थिती बदलली आहे,’ असेही पाटील यांनी नमूद केले.
पक्षात वैयक्तिक मतापेक्षा सांघिक मताला महत्त्व असते आणि अंतिम निर्णय पक्षप्रमुखच घेतात, असे सांगून पाटील म्हणाले की, १८ जानेवारीच्या बैठकीसाठी ‘दादा’ आपल्याकडे आले होते. त्यानंतर पवार साहेबांसोबत बारामतीला जाऊन चर्चा झाल्यानंतरच निर्णय झाला होता. मध्यंतरी शरद पवार रुग्णालयात असल्याने नवीन कोणतीही चर्चा झाली नाही. आपण कोअर कमिटीचे सदस्य असून आता बैठक बोलावल्यास नक्की जाऊ. सध्या तरी विलिनीकरणाबाबत आपल्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढील आठवड्यात पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक होण्याची शक्यता असून, त्यावेळी कोण कोणाला भेटले आणि नेमकी काय चर्चा झाली, हे समजेल. दोन्ही पक्षांचे प्रमुख, दोन्ही कोअर कमिटी आणि नंतर आमदार, अशी ही प्रक्रिया असते. १७ डिसेंबरला झालेल्या चर्चेतील सर्वच गोष्टी उघड करता येत नाहीत. सोय-गैरसोयीचा भाग नंतरचा असला तरी, ‘आता दादाच नाहीत, त्यामुळे काय सांगायचे,’ असे म्हणत पाटील यांनी आपले मत मांडले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘२० वर्षे परिणाम भोगतोय’, ‘सीरियल किसर’ इमेजवर इमरान हाशमीचे स्पष्ट भाष्य
- मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी! महापौर कार्यालय, विमानतळासह ५ ठिकाणे टार्गेटवर
- आमदार परिणय फुकेंच्या मुलाकडून मद्यधुंद अवस्थेत भीषण अपघात? एकाचा मृत्यू; विरोधकांचे गंभीर आरोप
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








