प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटाचे २० ते २२ आमदार फुटणार असल्याचा दावा केला होता. यावर आता अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे. “संजय राऊत म्हणतात की आमचे २५ किंवा २२ आमदार तिकडे जाणार, तर आमच्या आमदारांच्या कपड्यांच्या पिशव्या भरून तयार आहेत आणि आता कुठल्या पक्षात जायचे हे विचारण्यासाठी राऊतांकडेच जायचे आहे,” असा सणसणीत टोला पाटील यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा सध्या पुन्हा एकदा सुरू झाली असून विविध नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी केलेल्या दाव्याला उत्तर देताना अनिल पाटील यांनी हे विधान पूर्णपणे बेसलेस असल्याचे म्हटले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या वेळीही राऊत असेच बोलायचे आणि मग तोंडावर पडले, अशी आठवण करून देत राष्ट्रवादीचा एकही आमदार कुठेही जाणार नाही, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
याचवेळी अनिल पाटील यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. आमच्या पक्षाच्या स्तरावर विलीनीकरणाचा कोणताही प्रश्न सुरू नसल्याचे स्पष्ट करत, या मुद्द्यावर बोलण्याचा रोहित पवार यांना मुळात कोणताही अधिकार नसल्याचे ते म्हणाले. रोहित पवारांनी दुसऱ्यांवर बोलण्यापेक्षा स्वतःचा पक्ष आणि त्यात किती आमदार शिल्लक आहेत, हे तपासावे अशी खोचक टीकाही पाटील यांनी केली.
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना पाटील यांनी भाजपचाही संदर्भ दिला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपला वगळून विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘२० वर्षे परिणाम भोगतोय’, ‘सीरियल किसर’ इमेजवर इमरान हाशमीचे स्पष्ट भाष्य
- मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी! महापौर कार्यालय, विमानतळासह ५ ठिकाणे टार्गेटवर
- आमदार परिणय फुकेंच्या मुलाकडून मद्यधुंद अवस्थेत भीषण अपघात? एकाचा मृत्यू; विरोधकांचे गंभीर आरोप
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








