मुंबई पोलीस दलातील जवानाची गळफास घेऊन आत्महत्या; दुखापतीच्या नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल

दिंडोशी पोलीस ठाण्यातील शिपाई विजय बागुल यांनी पायाच्या दुखापतीने त्रस्त असल्याने नैराश्यातून कुर्ला येथील राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.

Published On: 

MHD LOGO

मुंबई, 13 नोव्हेंबर: मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका जवानाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विजय बागुल असे या पोलीस शिपायाचे नाव असून ते दिंडोशी पोलीस ठाण्यात आपली सेवा बजावत होते.

बागुल हे कुर्ला येथील नेहरूनगर पोलीस वसाहतीमध्ये वास्तव्याला होते. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून ते पायाच्या अंतर्गत दुखापतीने त्रस्त होते. वैद्यकीय उपचार करूनही त्यांच्या पायाच्या वेदना कमी होत नव्हत्या. यामुळे ते मानसिक नैराश्यात गेले होते आणि याच कारणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

राहत्या घरात गळफास घेतल्यानंतर बागुल यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विजय बागुल हे २००९ मध्ये मुंबई पोलीस दलात रुजू झाले होते आणि मागील चार वर्षांपासून ते दिंडोशी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते.

बागुल यांच्या पश्चात त्यांची पत्नी कोमल, दहा वर्षांचा मुलगा यश आणि सहा वर्षांची मुलगी श्रावणी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी, नाशिक येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कर्तव्यावर असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्याच्या अकाली निधनाने संपूर्ण पोलीस दलात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुःखद घटनेच्या निमित्ताने मुंबई पोलीस दलातील जवानांच्या आत्महत्यांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही