प्रतिनिधी, 12 नोव्हेंबर: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी असलेल्या कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यामध्ये ‘शेरशाह’ चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान एकदा ब्रेकअप झाले होते. नुकतेच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोच्या नवव्या आणि अंतिम सीझनमध्ये कियाराने स्वतः या ब्रेकअपमागील कारण उघड केले आहे.
या शोमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्यावर बोलताना कियाराने सांगितले की, ‘शेरशाह’च्या शूटिंगच्या वेळी ते एकमेकांच्या खूप जवळ आले होते. मात्र, नात्याच्या सुरुवातीला सिद्धार्थ कधी खूप चांगला, तर कधी अत्यंत उद्धटपणे वागायचा. त्याच्या या बदलणाऱ्या वागणुकीमुळे कियाराला मनस्ताप झाला होता.
‘शेरशाह’चे काही चित्रीकरण कारगिलमध्येही पार पडले. तिथे जाण्यापूर्वी कियाराने सिद्धार्थसोबत स्पष्ट संवाद साधला होता. ती सिद्धार्थला म्हणाली होती, “कधीकधी तू माझ्या खूप जवळ येतोस, आणि कधीकधी पूर्णपणे दूर जातोस. पण माझ्यासाठी, तू एकतर पूर्णपणे असतोस किंवा अजिबात नसतोस. ही मधली अवस्था माझ्या आकलनापलीकडची आहे. मी हे सहन करू शकत नाही.”
कियाराच्या या बोलण्यावर सिद्धार्थने तिला उत्तर दिले होते की, “मला माहीत आहे की, तू अशी आहेस की, जर मी तुला वचन दिलं, तर ते एक घट्ट नातं असेल. सध्या मी माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहे जिथे मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. माझ्या कामाच्या आड इतर कोणतीही गोष्ट येऊ नये असं मला वाटतं.”
या संवादानंतर दोघांनीही एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. असे असले तरी, कारगिलमधील कठीण परिस्थितीत शूटिंग करत असतानाही सिद्धार्थने तिला दररोज फोन केला. सलग ३० दिवस त्यांच्यात बोलणे झाले. ज्या ठिकाणी सिग्नल मिळणे कठीण होते, तिथूनही त्यांनी आपल्या नात्यासाठी वेळ काढला आणि लवकरच ते पुन्हा एकत्र आले.
यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये सिद्धार्थ आणि कियारा यांनी जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधत आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. तसेच, जुलै २०२५ मध्ये त्यांच्या घरी सराया नावाच्या मुलीचा जन्म झाला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘ते वाक्य रागाच्या भरात बोलून गेलो’; गोकुळमध्ये सत्ता येताच हसन मुश्रीफांना उपरती
- सराव सत्रात अर्शदीप सिंगने बाद केल्यानंतर विराट कोहली संतापला
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड वनडेपूर्वी मिचेल मार्शचा ‘सँडपेपरगेट’च्या प्रश्नावर भन्नाट रिप्लाय
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








