कोल्हापुरातील त्या दोन ‘वळूं’ना दारात उभं करू नका; गोकुळच्या निवडणुकीवरून संजय राऊतांचं शरद पवारांना आवाहन

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून संजय राऊत यांनी दोन मंत्र्यांवर जोरदार टीका केली असून, शरद पवारांनी त्यांना दारात उभं करू नये, असे आवाहन केले आहे.

Published On: 

Sanjay Raut speaking to the media about Kolhapur Gokul elections.

प्रतिनिधी, 12 नोव्हेंबर: कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दोन मंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या नेत्यांना ‘वळू’ संबोधत राऊत यांनी त्यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. ईडीच्या भीतीने पळून गेलेल्या या मंत्र्यांवर जेव्हा पळून जाण्याची वेळ येईल, तेव्हा शरद पवारांनी त्यांना आपल्या दारात उभं करू नये, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, कोल्हापुरातील या दोन वळूंनी आणि मंत्र्यांनी काल उच्छाद मांडला. गोकुळमध्ये जे घडलं त्याला निवडणूक म्हणता येणार नाही, तो विजय ओरबाडून घेण्यात आला आहे. २५ सदस्यांच्या संचालक मंडळात शेतकऱ्यांनी निवडून दिलेल्या सतेज पाटील यांच्या समविचारी पॅनलकडे १३ सदस्यांचे बहुमत होते. मात्र, अमित शाह यांना गोकुळ ‘अमूल’च्या घशात घालायचा असल्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबावाखाली येऊन चार सदस्यांची नियुक्ती केली, असा आरोप करत हा इतिहासातील काळाकुट्ट दिवस असल्याचे राऊत म्हणाले.

कोल्हापूरमध्ये घडलेला हा प्रकार लोकशाहीला मारक असून याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात दिसतील, असा इशारा राऊत यांनी दिला. कोल्हापूरशी नातं सांगणारे हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील अत्यंत खालच्या पातळीवर वागले. ईडीला घाबरून पळून जाणारे हे नेते शड्डू ठोकताना पाहून आश्चर्य वाटले. राजकारणात दिवस चंचल असतात, त्यामुळे पळून जाण्याची वेळ आल्यावर या वळूंना कुणीही दारात थारा देऊ नये, विशेषतः शरद पवारांनी त्यांना दारात उभे करू नये, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

डी. वाय. पाटील स्कूटरवरून फिरायचे, असा उल्लेख करत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना संपत्ती जाहीर करण्याचे आव्हान दिले होते. यावर पलटवार करताना राऊत म्हणाले की, जे स्वतः मर्द नसतात त्यांना दुसऱ्यांच्या शौर्याचा आणि कर्तबगारीचा द्वेष वाटतो. डी. वाय. पाटील यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर जगभरात साम्राज्य उभे केले असून एका मराठी माणसाच्या या यशाचे आम्हाला कौतुक आहे. मोदी चहा विकायचे आणि अदानी स्कूटरवर फिरायचे, मग त्यांचे साम्राज्य कसे उभे राहिले? चंद्रकांत पाटलांनी हाच प्रश्न अदानींना विचारावा, मी त्यांची भेट घडवून देतो, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.

कोथरूडमधील निवडणुकांमध्ये दहा-दहा हजार रुपये देऊन मते विकत घेण्यासाठी पैसा कुठून आला? असा खडा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. हा पैसा तंत्रशिक्षण खात्यातून आला की महसूल मंत्री असताना तिथून आला? अशी विचारणा त्यांनी केली. मंत्री विनाशाची भाषा करत आहेत. हातात सत्ता असली की कुत्र्यालाही आपण सिंह असल्यासारखे वाटते, पण हे तर वळू आहेत, अशा शब्दांत राऊत यांनी आपल्या टिकेची सांगता केली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही