मुंबई, 11 नोव्हेंबर: राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच एक मोठी घडामोड समोर आली आहे. अजित पवार गटाचे जवळपास २० आमदार आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ‘सिल्वर ओक’वर भेट घेण्याची शक्यता आहे. या आमदारांनी शरद पवारांच्या भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भेटीसाठी उत्सुक असलेल्या या २० जणांमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांचा समावेश आहे. वेळ मागणारे हे बहुतांश आमदार मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र भागातील आहेत. दिवाळीच्या निमित्ताने सदिच्छा भेट घेणे आणि शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करणे, असे कारण या आमदारांकडून सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतरच पडद्यामागे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत हालचाली सुरू असल्याच्या चर्चांना वेग आला. याच नाजूक राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आता आमदारांनी थेट शरद पवारांची वेळ मागितल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आता शरद पवार या आमदारांना भेटीसाठी वेळ देणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आमदारांची ही केवळ एक सदिच्छा भेट ठरणार की यातून महाराष्ट्रात नवा राजकीय भूकंप घडणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- रत्नागिरीत गिफ्ट दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या बंबात पाणीच नसल्याने नागरिकांचा संताप
- जन्मदात्या बापाकडून १० वर्षीय मुलीवर अत्याचार; आईने बसवलेल्या सिक्रेट कॅमेऱ्यातून प्रकार उघड
- मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; कारकीर्दीतील ३ सर्वोत्तम कामगिरी
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








