लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे १५०० रुपये कधी मिळणार? हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर

लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

Published On: 

Maharashtra Ekal Mahila Yojana announcement by Chandrakant Patil for single mothers

प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: राज्यभरातील लाखो पात्र महिलांना ‘लाडकी बहीण योजने’ (Ladki Bahin Yojana) अंतर्गत दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आता ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत शासनाने पैसे वितरित करण्याचा निर्णय घेतल्यास २५ नोव्हेंबरपर्यंत महिलांना ऑक्टोबर महिन्याचे पैसे दिले जाऊ शकतात.

दरम्यान, ही २५ नोव्हेंबरची तारीख सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनी सरकारच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दिवाळी आणि भाऊबीजेसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर, महिलांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे दोन महिन्यांचे ३००० रुपये एकत्र मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

मात्र, सरकारने दिवाळीपूर्वी नोव्हेंबर महिन्यात केवळ सप्टेंबर महिन्याचेच १५०० रुपये महिलांच्या बँक खात्यावर पाठवले. दोन महिन्यांचे पैसे एकत्र न मिळाल्यामुळे आता नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. जर नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोबरचे पैसे आले नाहीत, तर सरकार डिसेंबर महिन्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून ३००० रुपये एकत्र देणार का, अशी विचारणा होत आहे.

या संभाव्य ३००० रुपयांच्या एकत्र हप्त्याबाबत सरकारने अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात नेमके पैसे कधी आणि किती जमा होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही