सुनील तटकरे पुण्यात, सुनेत्रा पवारांची घेणार भेट; विलिनीकरणाच्या चर्चेसह अर्थखात्यावर केले थेट भाष्य

खासदार सुनील तटकरे यांनी पुण्यात सुनेत्रा पवारांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय वहिनीच घेतील, असे तटकरे म्हणाले.

Published On: 

Sunil Tatkare addressing media in Pune regarding NCP merger and Sunetra Pawar meeting

पुणे, 10 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली असून दोन्ही गटांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) पुण्यात दाखल झाले आहेत. ते आज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये विलिनीकरणावर चर्चा होणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

पुण्यातील विद्या प्रतिष्ठान येथे असलेल्या अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन तटकरे यांनी घेतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या भेटीचा तपशील दिला. कालच आपण सुनेत्रा पवारांना फोन करून पुण्यात येत असल्याची पूर्वकल्पना दिली होती. सुनेत्रा वहिनींची भेट घेणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना तटकरे म्हणाले की, आजचा क्षण अतिशय संवेदनशील असून आपण एका वेगळ्या भावनेत आहोत. या पवित्र स्मृतीस्थळावर कोणतेही राजकीय भाष्य करण्याची गरज नाही. सध्यातरी विलिनीकरणाचा कोणताही मुद्दा समोर नसल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले. आपण दिवाळीच्या निमित्ताने खेडेगावात असल्याने अलीकडच्या घडामोडींची आपल्याला फारशी माहिती नसल्याचे त्यांनी नमूद केले. विलिनीकरणावर सुनेत्रा वहिनीच निर्णय घेतील. तसेच, शरद पवार साहेब सहा दशकांपासून राजकारणात आहेत, त्यामुळे विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचा की नाही, हा सर्वस्वी त्यांचाच निर्णय असेल, असेही ते म्हणाले.

“मी गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात काम करत असून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणे टाळत नाही. मात्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून जर-तरच्या प्रश्नांवर बोलणे योग्य ठरणार नाही. वहिनींशी चर्चा करून योग्य वेळी मी यावर सविस्तर बोलेन,” अशी भूमिका तटकरे यांनी मांडली.

राज्यातील अर्थखाते राष्ट्रवादीलाच मिळाले पाहिजे, अशी ठाम मागणी यावेळी त्यांनी केली. दादांनी राज्याला विक्रमी अर्थसंकल्प दिला आहे. त्यांनी आतापर्यंत २१ अर्थसंकल्प सादर केले असून राज्याच्या प्रगतीत त्यांचे मोठे योगदान आहे. मला स्वतःला २०१० मध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे हे अर्थखाते आपल्याच पक्षाला मिळायला हवे, असा दावा तटकरे यांनी केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही