कोल्हापूर, 9 नोव्हेंबर: कोल्हापुरात सतेज पाटील यांनी १० नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या ‘संघर्ष मोर्चात’ विवेकानंद पाटील (Vivekanand Patil) यांनी आपल्या राजकीय वाटचालीबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी थेट भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना खुलं आव्हान देत त्यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
राज्य सरकारने गोकुळ दूध संघात चार संचालक नेमून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. हा शासन निर्णय इतर सहकारी संस्थांनाही लागू करण्यात आला असून, या माध्यमातून महायुती सरकार गोकुळची सत्ता हिसकावून घेण्याचा कट रचत असल्याचा आरोप होत आहे. सरकारच्या याच धोरणाविरोधात सतेज पाटील आक्रमक झाले असून त्यांनी हा मोर्चा काढला होता.
या मोर्चामध्ये विवेकानंद पाटील यांनी तुफानी भाषण करत महायुतीवर जोरदार टीका केली. त्यांनी चंद्रकांत पाटील यांना थेट ललकारताना म्हटलं, “ते (चंद्रकांत पाटील) कुठले आहेत हे मला माहितीय. त्यांनी कोल्हापूरच्या कोणत्याही विधानसभेतून फॉर्म भरावा. हा पठ्ठ्या अपक्ष उभा राहील.” इतकंच नाही तर, वेळ पडल्यास चंद्रकांत पाटलांच्या कोथरूड मतदारसंघातूनच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी त्यांनी मिश्किलपणे बोलून दाखवली.
नेत्यांवर निशाणा साधताना विवेकानंद पाटील यांनी अमूलच्या मुद्द्यावरूनही सणसणीत टोला लगावला. आपल्या भाषणात ते म्हणाले, “काल मी एका नेत्याचा फोटो पाहिला. हा नेता अमुल कंपनीचं चॉकलेट देत होता. का बरं. या नेत्याला गोकुळचं चॉकलेट सापडलं नाही का? नुसतं अमुल अमुल करत आहेत.”
एमपीएससी आंदोलनात दोन-दोन तास भाषणे करून विवेकानंद पाटील यांनी मोठी वातावरण निर्मिती केली होती. आता या नव्या घोषणेमुळे विवेकानंद पाटील २०२९ सालची विधानसभा निवडणूक खरोखरच लढवणार का आणि लढवल्यास त्यांना कोणता पक्ष तिकीट देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- गोकुळचे ४ ‘गुप्त’ शासकीय संचालक सतेज पाटलांकडून जाहीर; हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप
- IND VS NZ 3rd ODI: हॅमिल्टनमध्ये मुसळधार पाऊस, भारत-न्यूझीलंड तिसरा एकदिवसीय सामना रद्द होणार?
- ‘गोकुळ’च्या वादात भाजप नेते नवनाथ बन यांची उडी; संजय राऊतांना दिला ‘मातोश्री’वर मोर्चा काढण्याचा सल्ला
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






