देवेंद्र फडणवीस घाशीराम कोतवाल अन् पांडू हवालदार; ‘चीन फंडिंग’च्या आरोपावरून काँग्रेस नेत्यांचा जोरदार पलटवार

रामलीला मैदानावरील रॅलीबाबत फडणवीसांनी केलेल्या चीन फंडिंगच्या आरोपांवरून काँग्रेस आक्रमक झाली असून, हर्षवर्धन सपकाळ आणि वडेट्टीवारांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Published On: 

Harshvardhan Sapkal targets Devendra Fadnavis

प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: रामलीला मैदानावर झालेल्या रॅलीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ‘चीन फंडिंग’च्या आरोपांना काँग्रेस नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर सडकून टीका करत, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुम्ही घाशीराम कोतवाल आहात आणि गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात,” असा घणाघात केला. राज्यात कायदा अस्तित्वातच नसून अराजकता शिगेला पोहोचल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

चीनकडून फंडिंग मिळत असल्याच्या आरोपाचा समाचार घेताना सपकाळ म्हणाले की, केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्याच ताब्यात आहे. त्यामुळे असे आरोप करणे हे तुम्हाला सरकार चालवता येत नसल्याचे दिसून येते. तसेच, तुम्ही संविधानाची पायमल्ली करत असून, धादांत खोटे बोलत आहात. पक्ष फोडून आणि मते चोरून तुम्ही सत्तेत आला आहात, असा हल्लाबोलही सपकाळ यांनी केला.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या आरोपांवरून सरकारला धारेवर धरले. आजच्या रॅलीत अराजकता नेमकी कुठे दिसली, असा सवाल करत त्यांनी, “जनतेच्या नाही तर चोरांच्या भरवशावर तुम्ही मतचोरी करून सरकार बनवण्याचे पाप केले आहे,” अशी टीका केली. राहुल गांधींच्या नावाची धास्ती डोक्यात घुसल्यानेच ते अराजकतेची भाषा करत आहेत. जर चीनकडून फंडिंग मिळत असेल, तर केवळ आरोप करण्यापेक्षा त्याचे पुरावे शोधा, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीही यावर भाष्य केले. निवडणुका चोरल्या जात असल्याचे राहुल गांधी सातत्याने सांगत असून, दुर्दैवाने ज्ञानेश कुमार यांच्यावरील आरोप सत्य आहेत. भाजप त्यांची भूमिका मांडत असून, या चुकीच्या गोष्टी थांबल्या नाहीत तर लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच, मुख्यमंत्री मूळ विषय सोडून कायम दिशाभूल करणारी विधाने करतात, अशी टीका पाटील यांनी केली.

आंदोलन केले तर त्यात चुकले काय, असा प्रश्न उपस्थित करत सतेज पाटील यांनी भूतकाळात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ‘ट्रकभर पुराव्यां’च्या दाव्याची आठवण करून दिली. त्याचे पुढे काय झाले हे सर्वांनी पाहिले आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, रामलीला मैदानावरील इंडिया आघाडीच्या अभूतपूर्व रॅलीत तब्बल २० पक्ष एकवटले होते. २०२४ ची लोकसभा निवडणूक अवैध असून ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार असल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले. या रॅलीतून ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांनीही जोरदार प्रहार केला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही