प्रतिनिधी, 26 ऑक्टोबर: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कथित क्लिप प्रकरणावरून आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. या क्लिपच्या माध्यमातून केवळ एकनाथ शिंदे यांनाच नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही ‘गेम’ करण्याचे षडयंत्र होते, असा आरोप जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. यामागे देशातील कोणती यंत्रणा कार्यरत होती आणि त्यांचा हेतू काय होता, याचा शोध फडणवीसांनी घ्यावा, अशी मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली.
या क्लिपमुळे शिंदे आणि भाजपची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचे जरांगे म्हणाले. या प्रकारामुळे एकनाथ शिंदे आतून अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी कोणतेही पैसे घेतले नसून, ते असे खोटे आरोप खपवून घेणार नाहीत. सत्तेपेक्षा आणि मित्रपक्षापेक्षा वैयक्तिक प्रतिष्ठा महत्त्वाची असल्याने आपले राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचा डाव कोणी रचला, याचा शोध शिंदे नक्की घेतील. ते वरून गोड बोलत असले तरी त्यांच्या मनात मोठी खदखद आहे, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.
जरांगे म्हणाले की, फडणवीस यांना अंधारात ठेवून हा डाव रचला गेल्याचा तर्क आहे. क्लिपमध्ये संवाद साधणारे सात-आठ जण शिंदे आणि भाजपला संपवायला निघाले होते. मात्र, आता त्यांचाच पर्दाफाश झाल्याने ते स्वतःचेच व्हिडीओ व्हायरल करत आहेत आणि ‘आम्ही भाजपसाठी काम करतोय, पण भाजपच आम्हाला संपवत आहे’, असा उलटा कांगावा करत आहेत. या प्रकरणाच्या खोलात गेल्यास फडणवीसांचाही ‘गेम’ करण्याचा मनसुबा होता, हे समोर येईल.
क्लिपमध्ये बोलणाऱ्या या चार-पाच जणांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई केल्यासच यामागे शिंदे आणि फडणवीस नव्हते, हे सिद्ध होईल. या व्यक्ती कोण आहेत आणि त्यांना कोणती यंत्रणा मदत करत होती, हे उघड न झाल्यास यामागे फडणवीस असल्याचाच अर्थ निघेल. या सर्व विचित्र प्रकारामुळे भाजप आणि शिंदेंचे मोठे नुकसान होऊ शकते, तसेच मराठा समाजही त्यांच्यापासून दुरावू शकतो, असा इशारा जरांगे यांनी दिला.
सदर क्लिप कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून बनवली असल्याच्या दाव्याचेही जरांगे यांनी जोरदार खंडन केले. “आमच्याकडे धड मोबाईल नाहीत, तर आम्ही एआय कशाला बनवू? जर आम्ही हा व्हिडीओ तयार केला असता, तर त्यात वाढवण बंदर, अमेरिका आणि कर्नाटकचा विषय कशाला काढला असता? तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे, पत्रकार आणि संपादकांचा उल्लेख आम्ही कशाला केला असता? यात आमचे काय अडले आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- एकनाथ शिंदे यांचे नेत्यांना आदेश: ‘राजकारण थांबवा, थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जा’
- आदित्य ठाकरे कर्जत वृक्षतोडीविरोधात आक्रमक; आज घेणार प्रकल्पाचा आढावा
- न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या टी-२० सामन्यात इशान किशनचे पुनरागमन? वैभव सूर्यवंशीची घेणार जागा
Quick Answers
कथित क्लिपच्या माध्यमातून केवळ एकनाथ शिंदे यांचाच नव्हे, तर देवेंद्र फडणवीस यांचाही 'गेम' करण्याचे षडयंत्र होते, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
या क्लिपमागे देशातील कोणती यंत्रणा कार्यरत होती आणि त्यांचा नेमका हेतू काय होता, याचा शोध फडणवीसांनी घ्यावा, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
क्लिपमधील व्यक्ती कोण आहेत आणि त्यांना कोणती यंत्रणा मदत करत होती हे उघड न झाल्यास आणि त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास यामागे फडणवीस असल्याचाच अर्थ निघेल, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
आपल्याकडे धड मोबाईल नसताना एआय कशाला बनवू, असा सवाल करत, जर हा व्हिडीओ आपण तयार केला असता तर त्यात वाढवण बंदर, अमेरिका, कर्नाटक, तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे, पत्रकार आणि संपादकांचा उल्लेख कशाला केला असता, असे म्हणत त्यांनी या दाव्याचे खंडन केले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








