५०० कोटींची कथित ऑडिओ क्लिप आणि जरांगेंवर एकेरी टीका; भास्कर जाधवांनी सुनावले, ‘टीका करणाऱ्यांची कुवत…’

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर मनोज जरांगेंवर एकेरी भाषेत टीका करणाऱ्यांवर आमदार भास्कर जाधव यांनी निशाणा साधला असून, टीकाकारांची कुवत महाराष्ट्र पाहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published On: 

Bhaskar Jadhav clarification on the leaving thackeray group speculation

मुंबई, 25 ऑक्टोबर: ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून एकेरी भाषेत होत असलेल्या टीकेचा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी खरपूस समाचार घेतला आहे. जरांगे यांचे काम आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची कुवत संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

सध्या शिवसेना आणि भाजपचे काही नेते मनोज जरांगे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना भास्कर जाधव यांनी कोणाचेही नाव न घेता योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला. काही लोक स्वतःचे वय आणि अधिकार विसरून केवळ कोणाची तरी वाहवा मिळवण्यासाठी जरांगे पाटलांवर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. यातून संबंधितांवर झालेले संस्कार आणि त्यांची पातळी दिसून येते, असे जाधव यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे यांच्या कामाची पद्धत आणि आजवरचा इतिहास पाहता त्यांच्यात यत्किंचितही वैयक्तिक स्वार्थ दिसत नसल्याचे भास्कर जाधव म्हणाले. ते एक ध्येयवादी, निस्पृह आणि धैर्यवेडा माणूस आहेत. अनेक वर्षांपासून हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, हीच त्यांची प्रमुख मागणी आहे. हा समाज प्रामुख्याने मराठवाड्यात आणि थोडाफार पश्चिम महाराष्ट्रात आहे, तर विदर्भात त्याचे प्रमाण अतिशय कमी असून कोकणात तो नाहीच. मात्र, एका समाजाचा नेता म्हणून लोकांच्या हक्कासाठी ते लढत आहेत, याकडे जाधव यांनी लक्ष वेधले.

लोकांच्या हक्कासाठी निस्वार्थीपणे काम करणाऱ्या व्यक्तीवर जाणीवपूर्वक संशय निर्माण करणे आणि टाळ्या मिळवण्यासाठी वाटेल ते आरोप करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. अशा आरोपांमुळे मनोज जरांगे यांना कोणताही फरक पडणार नाही, उलट ते यातून अधिक मोठेच होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, रामदास कदम की एकनाथ शिंदे, यापैकी कोण मोठे हे त्या दोघांनीच मिळून ठरवावे, आगामी काळच कोण मोठे हे ठरवेल, असा टोलाही भास्कर जाधव यांनी शिवसेना नेत्यांना लगावला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मनोज जरांगे यांचे काम आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची कुवत संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही